Top Newsराजकारण

ठाकरे सरकार बरखास्तीची लोकायुक्त, राज्यपालांकडे मागणी करणार : चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत इमारतीचा दंड राज्य सरकारकडून माफ करण्यात आला आहे. याविरोधात भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरनाईक यांच्यावर राज्य सरकार मेहेरबान आहे. राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करण्यासाठी लोकायुक्त आणि राज्यपालांकडे दाद मागणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यासाठी लवकरच राज्यपाल आणि लोकायुक्तांची भेट घेणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याविरुद्ध न्यायालयात आणि राज्यपालांकडे तक्रार करण्यात येणार आहे. तसेच लोकायुक्तांचीही भेट घेणार आहोत. राज्य सरकारने आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा दंड आणि व्याज माफ केले आहे. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित असणाऱ्या मंत्र्यांविरोधातही फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर एखाद्या बँकेच्या संचालकांनी अवैध पद्धतीने कर्ज दिले तर त्यामुळे संपूर्ण संचालक मंडळाला तुरुंगात जावे लागते अशा प्रकारे राज्य मंत्रिमंडळ बरखास्त केले पाहिजे आणि प्रत्येक मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, मी असतो तर थोबाडीत लगावली असती. हे नारायण राणे महाडमध्ये बोलले तर त्याचा गुन्हा नाशिकमध्ये दाखल करण्यात आला होता. त्याच नाशिकमध्ये नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वक्तव्य केलं आहे. त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यामुळे हा हम करे सो कायदा सुरु आहे. सगळा कायदा हातात घेणं चाललं आहे. आता आम्ही कोर्टात जाणार आहोत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button