सातारा जिल्ह्यातील मीरगावात दरड कोसळून दहा जणांचा मृत्यू

सातारा : सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मीरगावात दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे, गुरुवारी रात्री अकरा वाजता दरड कोसळली होती, त्यामुळे घरे जमीनदोस्त झाली, काल गावातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असता तरी ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांना मीरगावात जेसीबी सारखी मशिनरी किंवा अन्य कोणतीच आली नसल्यामुळे काढण्यात यश आले नाही. शिवाय जोरदार पाऊस सुरू होता. आता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन जणांचे मृतदेह काढले आहेत, उर्वरित सात जणांचे मृतदेह काढले जात आहेत
कोयनानगर परिसरातल्या ज्या दरडाच्या पायथ्याशी गेल्या कित्येक वर्षापासून सुखाने संसार करणाऱ्या लोकांचे क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे, दरड घरावर कोसळल्यामुळे जमीन घरे जमीनदोस्त झाली आहेत, लोकांनी गाव सोडून स्थलांतरित केलय, तर संसारोपयोगी साहित्य रस्त्यावर पडली आहेत, ज्या दरडाच्या पायथ्याशी आम्ही खेळलो बागडलो ती दरड आमचा काळ म्हणून येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेवंताबाई बाकाडे आणि देवजी बाकाडे यांच्या मुलांनी व्यक्त केली आहे.