टेक्नोकडून नवीन ‘स्पार्क ८’ लाँच

नवी दिल्ली : टेक्नो या जागतिक प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने आज त्यांच्या लोकप्रिय स्पार्क सिरीजअंतर्गत नवीन व्हेरिएण्ट ‘स्पार्क ८’चे अनावरण केले. ३+३२ जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या या व्हेरिएण्टमध्ये विभागातील अग्रणी वैशिष्ट्ये आहेत आणि या व्हेरिएण्टची किंमत ९२९९ रूपये आहे. १६ मेगापिक्सल एनहान्स्ड ड्युअल रिअर हाय-रिझॉल्युशन कॅमेरा, ६.५६ इंच एचडी+ डॉट-नॉच डिस्प्ले आणि विशाल ५००० एमएएच बॅटरी अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी युक्त स्पार्क ८ ग्राहकांना सर्वांगीण स्मार्टफोन अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
टेक्नोची स्पार्क सिरीज किफायतशीर विभागामध्ये उच्च दर्जाचा कॅमेरा, डिस्प्ले आणि एकूण स्मार्टफोन अनुभवासाठी ओळखली जाते. ब्रॅण्ड तत्त्व कायम राखत स्पार्क ८ मध्ये विभागाला परिभाषित करणारी वैशिष्ट्ये आहेत, जसे जलद व सुलभ गेमिंग अनुभवासाठी हेलिओ जी२५ गेमिंग प्रोसेसर,आकर्षक व सुस्पष्ट सेल्फीज काढण्यासाठी ड्युअल फ्लॅशने युक्त ८ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा. या स्मार्टफोनमध्ये लक्षवेधक डिझाइनसह नवीन मेटल कोडिंग आहे, जे ग्राहकाच्या फॅशन दर्जाला उंचावर घेऊन जाते. नवीन व्हेरिएण्टमध्ये सुधारित इंडियन लँग्वेज सपोर्ट वैशिष्ट्य देखील आहे, ज्यामुळे ग्राहक त्यांच्या प्रियजनांसोबत स्थानिक भाषेमध्ये संवाद साधू शकतात व स्वत:ला अभिव्यक्त करू शकतात.
या लाँचबाबत बोलताना ट्रान्सियॉन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजीत तालापात्रा म्हणाले, टेक्नोमध्ये ग्राहकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी सर्व उत्पादन नवोन्मेष्कारांवर भर दिला जातो. नवीन स्पार्क ८ ३ जीबी व्हेरिएण्टसह आमचा ग्राहकांना किफायतशीर दरांमध्ये दर्जात्मक वैशिष्ट्ये देत त्यांच्या गरजांची पूर्तता करणारी उत्पादने निर्माण करण्याचा मनसुबा आहे. आम्हाला खात्री आहे की, स्पार्क ८ स्मार्टफोनच्या या नवीन ३ जीबी व्हेरिएण्टसह आम्ही नेहमीप्रमाणे ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यामध्ये यशस्वी होऊ.
स्पार्क ८ ३ जीबी व्हेरिएण्टची ठळक वैशिष्ट्ये:
– १६ मेगापिक्सल एन्हान्स्ड ड्युअल रिअल हाय-क्वॉलिटी कॅमेरा
– स्पार्क ८ ३ जीबी व्हेरिएण्टमध्ये १६ मेगापिक्सल एआय ड्युअल रिअर कॅमेरासह मोठे एफ१.८ अर्पेचर व क्वॉड फ्लॅशलाइट आहे, ज्यामुळे अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्ट फोटोज कॅप्चर करता येतात. तसेच या व्हेरिएण्टमध्ये विविध प्रो-शूटिंग मोड्स जसे एआय ब्युटी, स्माइल शॉट, एआय पोर्ट्रेट, एचडीआर, एआर शॉट, फिल्टर्स, टाइम-लॅप्स, पॅनोरमा, स्लो मोशन, व्हिडिओ बोकेह आहे, ज्यामुळे व्यावसायिकपणे फोटोज व व्हिडिओज कॅप्चर करण्यामध्ये मदत होते.
– सेल्फीप्रेमींसाठी स्पार्क ८ ३ जीबी व्हेरिएण्टमध्ये ८ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरासह ड्युअल फ्रण्ट फ्लॅश, वाइड सेल्फी, एआर शॉट आणि इतर अनेक मोड्स आहेत. ज्यामुळे अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्ट सेल्फी कॅप्चर होण्याची खात्री मिळते.
– प्रिमिअम फीलसाठी नवीन मेटल कोडिंग डिझाइन
– स्पार्क ८ मध्ये आकर्षक, लक्षवेधक, उत्साही व तरूण-केंद्रित डिझाइन आहे. एकीकृत करण्यात आलेल्या रिअर कॅमेरा डिझाइन्स, व्हिज्युअली स्लिम फ्रेम आणि अत्याधुनिक एनसीव्हीएम कलरिंग प्रोसेस ट्रेण्डी तरूणांसाठी डिझाइन करण्यात आलेले प्रिमिअम फिल व लुक देतात.
– सुधारित इंडियन लँग्वेज सपोर्ट वैशिष्ट्य
– स्पार्क ८ मध्ये सर्व भाषांसंदर्भात येणारे अडथळे दूर करण्यासाठी इंडियन लँग्वेज सपोर्ट वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य तुम्हाला तुमच्या स्थानिक भाषेमध्ये प्रियजनांसोबत संवाद साधण्याची आणि अभिव्यक्तीची सुविधा देते. स्पार्क ८ ३ जीबी व्हेरिएण्टमध्ये सुलभपणे संवाद साधण्याकरिता सर्व प्रमुख भारतीय स्थानिक भाषा आहेत.
– उच्च दर्जाच्या व्युइंगसाठी विशाल ६.५६ इंच एफएचडी+ डॉट नॉच डिस्प्ले
– स्पार्क ८ ३ जीबी व्हेरिएण्टमध्ये विशाल ६.५६ इंच एचडी+ डॉट नॉच डिस्प्ले आहे, ज्यामधून मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेता येतो. ४८० नीट्स ब्राइटनेसमुळे दिवसा प्रकाशात देखील स्क्रीन सुस्पष्ट दिसते. स्क्रीनचा आकार गेम्स खेळण्यासाठी, व्हिडिओज पाहण्यासाठी किंवा ई-लर्निंग, मीटिंग्ज इत्यादींसारख्या ऑनलाइन कृती करण्यासाठी परिपूर्ण आहे.
– हेलिओ जी२५ गेमिंग प्रोसेसर
– स्पार्क ८ ३ जीबी व्हेरिएण्टमध्ये २.० गिगाहर्टझ हेलिओ जी२५ गेमिंग प्रोसेसर आहे, ज्यामध्ये जलद कार्यसंचालनांसाठी ८ कोअर्स आहेत. यामधील हायपरइंजिन तंत्रज्ञान गेमिंगदरम्यान एकसंधी कार्यक्षमता देते.




