राजकारण

सोमय्यांकडून हसन मुश्रीफांविरोधात दुसऱ्या घोटाळ्याचे पुरावेही ‘ईडी’कडे सुपूर्द

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ईडी कार्यालयात हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील दुसऱ्या घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत. सोमय्यांनी यापूर्वी मुश्रीफ यांच्याविरोधातील पहिल्या घोटाळ्यासंदर्भात २७०० पानी पुरावे सादर केले आहेत. शेल कंपन्यांच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा पहिला आरोप होता तर आता साखर कारखान्यांच्या माध्यमातून दुसरा १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ब्रीक्स इंडिया हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची बेनामी कंपनी आहे. या कंपनीद्वारे मुश्रीफ कुटुंबीयांनी कशी गुंतवणूक केली त्याबाबते पुरावे आपण ईडी कार्यालयात सादर केले असल्याचे किरीट सोमय्या यांनी केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडी कार्यालयात पुरावे सुपूर्द केल्यानंतर म्हटलं आहे की, जे बेनामी कंपनी भ्रष्टाचार, बोगस कंपन्या यांच्याकडून किती पैसे घेतले आणि कुठे दिले याबाबतचा सविस्तर रिपोर्ट सादर केला आहे. सरसेनापती कागल येथील साखर कारखान्याची माहिती दिली होती. आज अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना लिमिटेड याच्यात १०० कोटी रुपये कशाप्रकारे आले. बेनामी कंपन्यांद्वारे शेल कंपन्या ज्यांच्यावर २०१७-१८ साली प्रतिबंध आला. ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत त्या कंपन्यांच्या नावे बेनामी अकाऊंट तयार करण्यात आले. त्या अकाऊंटमधून या कारखान्यात पैसे आले. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना ब्रीक्स इंडियाला चालवण्यासाठी दिले. ब्रीक्स इंडियाला राज्य सरकारने साखर कारखान्याला अधिक आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले. या सगळ्यांचे सातबारा ईडीला दिले आहेत. ब्रीक्स इंडिया हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची बेनामी कंपनी आहे. बोगस कंपन्यांद्वारे पैसे मुश्रीफ कुटुंबीयाने गुंतवले आहेत. यासंदर्भात ईडी चौकशी करत असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे.

काय आहे दुसरा घोटाळा?

हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा उघड करताना सोमय्या म्हणाले की, ‘मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यांचा संबंध काय? असा सवाल केला. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे. त्याच्यामध्येही तशाच पद्धतीने कोलकाताच्या शेल कंपन्यांद्वारे म्हणजे ज्या कंपन्या अनेक वर्षांपूर्वी बंद झाल्या आहेत. त्याच्यात बोगस अकाउंट उघडायचं आणि त्या बँक अकाउंटमध्ये मुश्रीफांच्या एजेंटनी कॅश टाकायची. दोन लेअर बनवून स्वतः पैसा घेतले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button