भारतातील ‘वुमन इन इंजिनियरिंग’ उपक्रमाच्या अध्यक्षा : सिंधू नायर
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/03/lT-703x405.jpg)
मुंबई : इंजिनियरिंग क्षेत्राकडे कायम पुरुषांचे क्षेत्र म्हणून पाहिले जाते. ऐतिहासिकदृष्ट्या इंजिनियरिंगची प्रतिमाही कायम कठीण, अवघड, मळलेली आणि यंत्रांशी संबंधित अशीच राहिलेली आहे. अशा सांस्कृतिक प्रतिमा ताकदवान आणि व्यवसायाच्या वाटणीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या असतात, जिथे इंजिनियरिंग स्त्रियांसाठी योग्य नसल्याचे समजले जाते. इंजिनियरिंग हे पुरुषांचे वर्चस्व असलेले क्षेत्र आहे. काही जण अवजड उपकरणे आणि लिंग असमतोलामुळे हे स्त्रियांचे काम नाही असे म्हणतात. पण तुम्हाला माहीत आहे का? हे सगळं चुकीचं आहे.
एल अँड टी ही भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत इंजिनियरिंग, खरेदी आणि बांधकाम कंपनी वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक वातावरणाला चालना देत इंजिनियरिंग क्षेत्रातील स्त्रियांबाबत असलेले गैरसमज तोडण्याचा प्रयत्न करत आहे. उर्जा ट्रान्समिशन आणि वितरण, स्टीम टर्बाइन्स असो, हैद्राबाद मेट्रो चालवणं असो, रॉकेट मोटर केसिंग, संरक्षक क्षेपणास्त्र यंत्रणा किंवा न्युक्लियर कंटेनर सो, एल अँड टीमधील स्त्रिया इंजिनियरिंग, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रातील सर्वात आव्हानात्मक भूमिका नेटाने निभावत आहेत.
सौंदर्याची उभारणी – सिंधू नायर, प्रमुख इंजिनियरिंग व्यवस्थापक, इंजिनियरिंग, डिझाइन अँड रिसर्च सेंटर (ईडीआरसी), एल अँड टीज बिल्डींग्ज अँड फॅक्टरीज, मुंबई.
पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही मुंबई विमानतळावरील टी-2 वर विमानासाठी थांबलेले असाल, तेव्हा छताकडे पाहा. तिथल्या दर्शनी भागाच्या कॉफर्ड कनोपी आणि नाजूक स्टील ट्रुसेसचे डिझाइन टर्मिनल इमारतीचे बांधकाम करणाऱ्या टीमचा भाग असलेल्या सिंधू नायर यांचे आहे.
प्रमुख इंजिनियरिंग व्यवस्थापक, इंजिनियरिंग, डिझाइन अँड रिसर्च सेंटर (ईडीआरसी), एल अँड टीज बिल्डींग्ज अँड फॅक्टरीज, मुंबई या पदावर असलेल्या सिंधू यांनी व्हीजेटीआय मुंबई येथून बीई सिव्हिल केले असून त्यानंतर आयआयएम- अहमदाबाद येथे व्यवस्थापन शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
श्रीमती नायर यांच्याकडे 18 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी विमानतळ, निवासी आणि व्यावसायिक इमारती, जल प्रक्रिया कारखाने आणि पुलांचे डिझाइन केले आहे.
त्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या (भारत) फेलो, रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड इंजिनियर्स आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनलच्या (पीएमपी) सदस्य आहेत. त्याचप्रमाणे त्या इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्सच्या (युके) भारतातील ‘वुमन इन इंजिनियरिंग’ उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.
श्रीमती नायर यांच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू आहेत. त्या कर्नाटकी संगीताच्या चाहत्या, उत्तम चालक आणि कार रॅलीस्ट तसेच प्राणीप्रेमी आहेत. पाठिंबा देणारा जोडीदार आणि पालक लाभल्यामुळे त्या स्वतःला सुदैवी समजतात. त्या आणि त्यांचा 17 वर्षांचा मुलगा आसापासच्या भटक्या कुत्र्यांची काळजी घेतात.