राजकारण

शिवसेना नेते किशोर तिवारी यांची एनसीबी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई : मुंबई शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी आर्यन शाहरुख खान प्रकरणात सर्वोच्च न्यायालय गाठले आहे. एक पत्र लिहून तिवारी यांनी एनसीबीच्या विरोधात तक्रार करत मानवाधिकार जपण्यासाठी आणि सत्तेचा गैरवापर थांबावावा यासाठी सु मोटो या प्रकारणाची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

कोर्टाकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी किशोर तिवारी ह्यांनी केली आहे. १७ दिवस आर्यन खान हा जेल मध्ये असून त्यात दिरंगाई होत असल्याचा आक्षेप घेत गेल्या काही काळापासून एनसीबी ही फिल्म इंडस्ट्री व मॉडेल्सला हेतूपुरस्सर टार्गेट करत असल्याचे ही म्हटले आहे. नाव न घेता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे व अभिनेत्री बायको क्रांती रेडकर यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत हे रेडकर यांच्या करिअरशीही याचा संबंध लावला आहे.

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

आर्यन खानला २० ऑक्टोबरला होणाऱ्या सुणावणीत जामीन मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्यन खानतर्फे अमित देसाई, सतीश मानशिंदे तर एनसीबीकडून अनिल सिंह दाखले देणार आहेत. आर्यनचा ट्रायल नंबर एन९५६ आहे. तुरुंगातील कैद्यांना त्यांच्या नंबरच्या नावाने ओळखले जाते. त्याचमुळे आर्यनला त्याचा कैदी नंबर मिळाला आहे. आर्यन खान तुरुंगात वैतागलेला दिसून येतो. त्याला तुरुंगात मिळणारे जेवण आवडत नसल्याने तो जेवतदेखील नाही. तुरुंगात बाहेरचे जेवण आणण्याची परवानगी नाही. आर्यन तुरुंगात त्याचे घरचे कपडेच घालतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button