राजकारण

उठसूट राजीनामा मागणे हा विरोधकांचा उद्योग : संजय राऊत

मुख्यमंत्री कॅबिनेटचे प्रमुख, निर्णय तेच घेतील

नवी दिल्ली : माझी शरद पवार यांच्याशी भेट झाली. दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शऱद पवार हे आता दिल्लीत येतील. सरकार विरोधी पक्षासाठी चालत नाही. ते राज्यासाठी, जनतेसाठी चालतं. विरोधकांकडे बहुमत असले तर विरोधकांनी सरकार स्थापन करावे. विरोधकांची प्रत्येक मागणी ही सत्यावरच आधारलेली असेल असं नाही. त्यांनी एखादी मागणी केली असेल. उठसूट राजीनामा मागणे असा उद्योग विरोधकांचा सुरु झाला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री कॅबिनेटचे प्रमुख असतात. सरकारचे प्रमुख असल्याने त्यांना अधिकार आहेत. गृहमंत्री असो किंवा अन्य कोणताही मंत्री असो त्यांच्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. तसेच या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असेही वक्तव्य राऊत यांनी केले आहे.

राज्यातील गृहमंत्र्यांवर झालेल्या आरोपांनंतर आता दिल्लीत बैठकांचे सत्र सुरु आहे. दिल्लीतील घाडामोडींना वेग आला आहे. राज्याती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सरकारी कामकाजावर चर्चा झाली आहे. तसेच पक्षाच्या अंतर्गत विषयावर चर्चा करण्यात आली. मीडियासमोर सांगण्यासारखे नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पोलीस आयुक्तांच्या शिफारशीशिवाय कोणालाही नोकरीवर घेतलं जात नाही. आमच्यासाठी वाझे हा विषय आता संपला आहे. जुलिओ रिबेरो यांनी राज्यातील या प्रकरणावर एक लेख लिहला आहे. त्यांनी जर या प्रकरणाची चौकशी केली. तर त्यांच्या अहवालावर सगळेच विश्वास ठेवतील, असे राऊत म्हणाले.

विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावरील मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावर संजय राऊत यांनी म्हटले आहे की, सरकार विरोधी पक्षासाठी चालवत नाही त राज्यासाठी जनतेसाठी काम करते. बहुमत असेल तर सरकार स्थापन होते आणि विरोधकांकडे बहुमत असे तर त्यांनी सरकार स्थापन करावे आणि निर्णय घ्यावे. राज्य सरकारने घेतलेले निर्णय सरकारशी बांधिल असतात. विरोधकांनी केलेली मागणी हि प्रत्येक मागणी सत्यावर अधारित असेल असे नाही. हल्ली विरोधकांनी उठ सूठ राजीनामा मागणे हा विरोधी पक्षाचा नवीन उद्योग झाला आहे.

कोणत्याही अधिकाऱ्याची पोलीस आयुक्ताच्या शिफारशीनुसार नियुक्ती केली जाते. आयुक्ताच्या शिफारशीनुसार वाझेंना घेण्यात आले आहे. तसेच आमच्यासाठी सचिन वाझे हा विषय संपलेला आहे. असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ज्युलिओ रिबेरोंनी चौकशी करावी
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांचा तपास निवृत्त पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरोंनी चौकशी करावी असे म्हटले होते. यावर संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ज्युलिओ रिबेरो हे जुने जाणते आहेत. त्यांनी चौकशी केली तर जनता त्यांचा निर्णय मान्य करेल असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

विरोधकांना काय हवंय त्यांनी ठरवावं
विरोधी पक्षाने आपापसात मेळ जमवला पाहिजे काही दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांना निलंबित करा ते विश्वासास पात्र नाहीत असे म्हटले होते. परंतु तेच विरोधी पक्ष आता परमबीर सिंग यांना डोक्यावर घेत आहेत. विरोधकांनी ठरवायला पाहिजे त्यांची मत आणि भूमिका काय आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button