राजकारण

सचिन वाझे ठाकरे सरकारचे वसुली अधिकारी; फडणवीसांची घणाघाती टीका

नवी दिल्ली : सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना परत पोलीस सेवेत का घेतले?. मी मुख्यमंत्री असताना वाझेंना परत घेण्याचा शिवसेनेकडून दबाव होता. मी ज्येष्ठ वकिलांचा घेतला. वाझेवर हायकोर्टानं कारवाई केल्यानं त्यांना घेण्यास मनाई केली गेली. सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यातून बिझनेस रिलेशन तयार झाले. नंतर महाविकास आघाडी आल्यानंतर सचिन वाझेला घेतले गेले. कोरोनाचे कारण सांगून सचिन वाझेंना सेवेत घेतले. पण इतर अधिका-यांना सेवेत घेतले नाही. वाझे हे ठाकरे सरकारचे वसुली अधिकारी आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर आणि शिवेसेनेवर जोरदार टीका केली आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन त्यांनी अनेक गंभीर आरोप सरकारवर केले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबतही फडणवीस यांनी वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएने केला पाहिजे. एटीएसवर अविश्वास नाही पण त्यांच्यावर दबाव आहे का? त्यांच्याकडून जसा तपास व्हायला हवा, तसा तपास होत नाही त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएने करावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. हा सर्व प्रकार पोलिसांचं अपयश नसून राज्य सरकारचं अपयश आहे.

फडणवीस यांनी म्हटलं की, मनसुख हिरेन यांची हत्या केली गेली. अशा सर्व घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाल्या नाही. ९० च्या दशकात राजकारणाचे गुन्हेगारीकरण याचा अनुभव घेतला होता. रक्षा करणारेच गुन्हेगार बनले तर सुरक्षा कोण करणार ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

सचिन वाझेवर खंडणीची केस चाललीय. वसई प्रकरणात खंडणी केस होती. वाझेचा खराब रेकार्ड असतानाही वाझेला घेतले. क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये सचिन वाझेला घेतले. हे पोलीस निरीक्षकाचं पद आहे परंतु एपीआयला घेतले. कोणतीही केस सीआययूकडे येते. आयुक्तानंतर सचिन वाझेंचे पद मोठे होते. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद, शिवसेना मंत्र्यांसोबत वाझे दिसत होते. वाझे वसूली अधिका-याच्या रूपाने बसवले, असं फडणवीसांनी म्हटलं.

‘मनसुख हिरेनला वाझे इंटरोगेट करत होते. हिरेन यांची गाडी हरवली अशी तक्रार घ्यायला वाझेंनी पोलिसांना फोन केला. मनसुख हिरेनची हत्या करून मृतदेह हायटाईडमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु हायटाईड ऐवजी लो टाईड आली. म्हणून मनसुख हिरेनचा मृतदेह पाण्यात गेला नाही. बाहेरच राहिला. मनसुख हिरेनची केस एटीएसकडे आहे. एटीएस कारवाई करताना दिसत नाही, काय कारण आहे? पोलिसांकडे जास्त पुरावे आहेत. एटीएसकडे टेप आहेत त्यात मनसुख आणि वाझेचे आवाज आहेत. हेच पुरावे आहेत.’

मनसुखची घटना एकटे वाझे करू शकत नाही. यात अनेकांचा हात आहे. पोलिसांचे अपयश नाही तर सरकारचे आहे. मुख्यमंत्री एका पोलिसाला वाचवत आहेत. सचिन वाझेला महात्मा ठरवलं जातंय का असं वाटत होतं.’ अशी टीका देखील फडणवीसांनी केली आहे.

मनसुख हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली. दुसऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याने हिरेन यांची चौकशी केली नाही. यावेळी हिरेन यांची चौकशी दुसऱ्या संस्था करु शकतात हे समजल्यामुळे वाझे हे हिरेन यांना वकिलाकडे घेऊन गेले. तसेच मला अनेकजण त्रास देतात, अनेकजण चौकशी करतात अशी तक्रार करण्याचे सांगितले. यावेळी वाझे यांनी आपले स्वतःचे नाव सुद्धा टाकले.

एका दिवशी मनसुख यांना फोन आला. गावडे यांनी बोलवलं असल्याचं हिरेन यांना सांगण्यात आलं. वाझे यांच्यावर एक्स्टॉर्शनचे आरोप आहेत, त्याच भागात हिरेन यांना बोलवण्यात आलं. त्यांतर त्यांचा मृतदेह आढळला. हिरेन यांचा यांच्या तोंडात रुमाल टाकले गेले. हिरेन यांची हत्या झाली. पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट दिलेलं आहे की हिरेन यांच्या फुप्फुसात पाणी नाही. त्यांनी जर खाडीत आत्महत्या केली असती तर त्यांच्या फुफ्फुसात पाणी गेलं असतं. पण तसं नाहीये. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाली. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण या दोन्ही घटना एकमेकांशी कनेटक्टेड आहेत. हो दोन्ही प्रकरणं एनआयने स्वत:कडे सोपवली पाहिजेत, असेही फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button