झारखंडमधील बडकागांव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अंबा प्रसाद यांनी सोमवारी थेट घोड्यावरुन विधानसभा परिसरात रॉयल एन्ट्री केली. निमित्त होतं जागतिक महिला दिन. महाराष्ट्राप्रमाणेच झारखंड विधीमंडळाचंही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यावेळी आमदार अंबा प्रसाद यांनी थेट घोड्यावर बसून विधानसभा परिसरात प्रवेश केला. ही एण्ट्री दिवसभर चर्चेचा विषय ठरली.