फोटो गॅलरी

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचं लॉकडाऊन लग्न

दुबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने, कुणाल बेनोडेकर याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. दुबईमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. मराठी मनोरंजन विश्वात ‘अप्सरा’ म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आज (१८ मे) अर्थात स्वतःच्या वाढदिवशी चाहत्यांना एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा पार पडला होता. वाढदिवसाचं निमित्त साधत लॉकडाऊनच्या काळात सोनालीनं ही गुड न्यूज सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही!, असं सोनाली कुलकर्णीने म्हटलं आहे. ढे जेव्हा, जिथे, जसं शक्य होईल, तेव्हा, तिथे, तसं, परीवार आणि मित्रमंडळींबरोबर सगळ्या विधीनिशी आमचं ड्रीम वेडिंग करूच. तोवर आणि कायम तुमचा प्रेम आणि आशिर्वाद असूद्या, असं म्हणत तिने सर्वांचे आशीर्वाद मागितले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button