अर्थ-उद्योग

बँक, आयटी आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील स्टॉक्समध्ये तेजी

मुंबई : अस्थिर ट्रेडिंग सत्र असूनही भारतीय इक्विटी निर्देशांकांने आज उच्चांकी स्थिती गाठली. यात खासगी बँका, आयटी आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील स्टॉक्सनी नफा कमावला. निफ्टी १४२.२० अंकांनी वधारला व १५,००० च्या पुढील पातळी गाठत १५,०९८.४० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ५८४.४१ अंकांची उसळी घेत ५१,०२५.४८ अंकांवर स्थिरावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात एसबीआय लाइफ इन्शुरन्स (४.९७%), कोटक महिंद्रा बँक (३.०८%), एचडीएफसी बँक (२.९३%), टेक महिंद्रा (२.७६%), आणि एचडीएफसी (२.७०%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर याउलट बीपीसीएल (४.५५%), टाटा स्टील (३.९०%), गेल इंडिया (३.३१%), आयओसी (२.९०%), आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (२.११%) हे निफ्टीतील लूझर्समध्ये समाविष्ट झाले.

क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी बँक व आयटी व्यतिरिक्त सर्व लाल रंगात स्थिरावले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप हे अनुक्रमे ०.६६% आणि ०.४१%नी घसरले.

स्टील स्ट्रीप्स व्हील्स लि.: स्टील स्ट्रीप्स व्हील्स लि. या अग्रगण्य व्हील निर्मिती करणाऱ्या कंपनीने पुढील वर्षी ईबीआयटीडीए मार्जिन १५% पेक्षा जास्त अपेक्षित ठेवली तर महसूलात ३००० कोटी रुपयांची वाढ होणार असल्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ५.१४% नी वाढले व त्यांनी ७४५.९५ रुपयांवर व्यापार केला.

इंडोको रिमेडीज लि.: इंडोको रिमेडीज कंपनीने अमेरिकेत ब्रिंझोलॅमाइड ऑफ्थॅल्मिक सस्पेंशन १% च्या लाँचिंगची घोषणा केली, जे गोव्यातील तेवा (TEVA) प्रकल्पात निर्माण केले जाईल. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ३.९२% नी वाढले व त्यांनी २८७.५० रुपयांवर व्यापार केला. ब्रिंझोलामाइड ड्रॉप्स डोळ्यातील उच्च दाबावर उपचारासाठी वापरतात. हायपर टेंशन किंवा ओपन अँगल ग्लॅकोमामुळे ही स्थिती उद्भवते.

जेएमसी प्रोजेक्ट्स (इंडिया) लि.: जेएमसी प्रोजेक्ट्स शेअर्सने १,००० कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पासाठी फाही धिरीरुलहून कॉर्पोरेशन ऑफ मालदिव्जसोबत भागीदारी केली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ८.४% नी वाढले व त्यांनी ८५.३५ रुपयांवर व्यापार केला.

लार्सन अँड टर्बो लि. : एलअँडटीचे शेअर्स ०.३४% नी घसरले व त्यांनी १५१०.०० रुपयांवर व्यापार केला. फर्मने गोरखपूर हरियाणा अणू विद्युत परियोजना प्रकल्प १ व २ साठीची चार ७०० एमडब्ल्यूई स्टीम जनरेटर्सची ऑर्डर पूर्ण केल्यानंतर हे परिणाम दिसून आले.

लुपिन लि.: लुपिन लिमिटेडच्या कॅनडा शआखेने इंडोस्युटिक्स सोबत भागीदारी करण्याची घोषणा केली. इंट्रारोसा या महिला आरोग्य केंद्रित उपक्रमातील कॅनडिअन बायोटेक कंपनीच्या व्यावसायिकरणासाठी ही भागीदारी झाली. तरीही कंपनीचे स्टॉक्स १.६६७% नी घसरले व त्यांनी १०३३.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ३२ पैशांची उसळी मारत, ७२.९३ रुपयांवरून ७३.२२ रुपये प्रति डॉलर एवढे मूल्य कमावले.

जागतिक बाजारात सुधारणा: मजबूत यूएस इक्विटी फ्युचर्स आणि अमेरिका तसेच युरोपीयन बाँड यील्ड्समध्ये घसरण झाल्याने जागतिक बाजारात सुधारणा दिसून आली. एफटीएसई १०० चे शेअर्स ०.९२%, एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.४५%, आणि निक्केई २२५चे शेअर्स ०.९९% नी वाढले तर हँगसेंगचे ०.८१%.नी घसरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button