आरोग्य

कोरोनाचा कहर; नाशिक जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

नाशिक, मालेगावमध्ये शाळा, क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद

नाशिक : राज्यभरात कोरोना (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घालत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कारण उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यात नवे निर्बंध (Restrictions in Nashik) लागू केले आहेत.

‘नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दाहकता वाढली आहे. 1 महिन्यात रुग्णसंख्येत चौपट वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री आणि अधिकारी यांच्यासोबत परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र गर्दीबाबत आवाहन करूनही नियंत्रण अवघड होत असल्याने जिल्ह्यात नवे निर्बंध लागू करण्यात येत आहेत,’ अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाबत नवी नियमावली; काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
– जिल्ह्यात नाशिक आणि मालेगावमध्ये सर्व शाळा आणि क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद
– 10वी,12वी शाळा पालकांच्या संमतीनुसार
– सर्व धार्मिक स्थळं सकाळी 7 ते सायंकाळी 7 खुले राहील मात्र शनिवार,रविवार पूर्ण बंद
– गर्दी जमणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना बंदी
– भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने परवानगी
– नाशिक,नांदगाव,मालेगाव,निफाड या 4 तालुक्यातील सर्व शाळा अनिश्चित काळासाठी बंद
– जीवनावश्यक वस्तू संबंधित इतर सर्व दुकाने सकाळी 7ते रात्री 7
– 15 मार्च नंतरच्या सर्व विवाहसमारंभांना परवानगी नाही
– जिम,व्यायामशाळा,फिटनेस सेंटर फक्त व्यक्तिगत वापरासाठी परवानगी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button