Top Newsराजकारण

‘सायकल’चं बटण दाबल्यावर ‘कमळा’ची पावती ! समाजवादी पक्षाच्या १५० तक्रारी

लखनौ : समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये राज्यातील ५९ जागांवरील मतदानादरम्यान मतदान केंद्रांवर गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील ५९ जागांसाठी मतदान झालं. काळ सकाळी मतदान सुरू झाल्यापासून ५ तासांत समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक-दोन नव्हे तर सुमारे १५० तक्रारी ट्विट करण्यात आल्या. हा आकडा दर तासाला वाढत होता. ‘कानपूर ग्रामीण भागातील भोगनीपूर मतदारसंघातील मतदान क्रमांक १२१ वर सायकलच्या चिन्हाचे बटण दाबल्यावर भाजपची पावती बाहेर येत आहे. निवडणूक आयोगाने दखल घेऊन सुरळीत आणि निष्पक्ष मतदानाची खात्री करावी, असा आरोप समाजवादी पक्षाने एका ट्विटमध्ये केला होता.
भोगनीपूरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत ट्विटरच्या माध्यमातून आरोपाचं खंडन केलं आहे. विधानसभा मतदारसंघ २०८ मधील मतदान क्रमांक १२१ मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. मतदान केंद्रावरील मतदान सुरळीत आणि निष्पक्ष सुरू आहे. मशिन्समध्ये कोणतीही अडचण नाही, असे त्यांनी सांगितले.

त्याचवेळी कानपूरच्या जिल्हाधिकारी नेहा शर्मा यांनीही माहिती दिली. आतापर्यंत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत ज्यात मतदानाची गोपनीयता भंग झाली आहे. आम्ही तिन्ही प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले होते. मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघातल्या मतदान क्रमांक ३१९, ३२० वर भाजप उमेदवार एसपी सिंह बघेल हे पोलिंग पार्टीला धमकावत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे, निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने कृपया याची दखल घेऊन निष्पक्ष व भयमुक्त निवडणुका घ्याव्यात, असा दावा आणखी एका आणखी एका ट्विटमध्ये करण्यात आला होता.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव स्वतः करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना कडवी टक्कर देण्यासाठी भाजपाने केंद्रीय मंत्री आणि आग्राचे खासदार एसपी सिंह बघेल यांना येथून उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या टप्प्यात हाथरस, फिरोजाबाद, एटा, कासगंज, मैनपुरी, फारुखाबाद, कन्नौज, इटावा, औरैया, कानपूर देहत, कानपूर नगर, जालौन, झांसी, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा जिल्ह्यात मतदान झालं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button