राजकारण

केवळ राजीनामा नको, राठोड यांना अटक करा; भाजप नेते आक्रमक

मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांनी आज (रविवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे म्हणाले की, ‘विरोधी पक्षाचा दबाव असल्यानेच आणि भाजपच्या महिला आघाडीने आंदोलन केल्याने १८ दिवसांनंतर राजीनामा दिला. एफआयआर दाखल होण्याची गरज आहे. तसेच या प्रकरणात राठोड यांना अटक करण्याची गरज आहे. शिवसेना बलात्काऱ्यांना पाठीशी घालत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राहिलीच कुठे? असे माझे प्रामाणित मत आहे. विरोधी पक्षाच्या दबावामुळेच अधिवेशनाच्या तोडांवर हा राजीनामा देण्याची नामुष्की संजय राठोड यांच्यावर आली आहे.’

‘भारतीय जनता पार्टी ज्या आक्रमकपणे रस्त्यावर उतरली आणि आंदोलन केली. त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेच्या एका अर्थाने विजय झाला आहे. महाराष्ट्राच्या तीन सत्ताधारी पक्षाची ही नामुष्की आहे. कारण ३० दिवसांच अधिवेशन घेण्याची याची हिंमत नाही. देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे प्रश्न विचारतील त्याला उत्तर देण्याची याची हिंमत नाही. त्यामुळे घाबरलेलं सरकार अधिवेशन आठ दिवसांच घेतंय. हा विषय भारतीय जनता पार्टीचे नेते आक्रमकपणे उचलून धरतील आणि यामुळे आपली कोंडी होईल. त्यामुळे आपली कोंडी होऊ नये म्हणून हा अशाप्रकारचा निर्णय सरकारने घेतला आहे. उद्या अधिवेशन आणि आज तुमची झोप उडते? उद्या अधिवेशन आज तुम्ही निर्णय घेता? मग १५ दिवस काय झोपला होतात का? कोणती कुंभकर्णाची निद्रा होती तुमची? कोणते कानात कापसाचे गोळे घातले होते? महाराष्ट्राची जनता तुम्हाला प्रश्न विचारत होती, त्यावेळेस तुमचा कोणता अहंकार मधे आला? महाराष्ट्राच्या सरकारला या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. अधिवेशन तोंडापाशी आलं आणि अधिवेशनात तोंडावर पडला, तेव्हा हा निर्णय घेतला. याच्या अगोदर निर्णय का घेतला नाही?’ असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला. तसंच ते पुढे म्हणाले की, ‘जरी हा निर्णय घेतला असला तरी अनेक प्रश्नांची उत्तर अजून महाराष्ट्राच्या सरकारकडे नाहीत. त्यामुळे केवळ हेच कारण आहे, ३० दिवसांच अधिवेशन आठ दिवसात संपवण्याचं.’

राजीनामा दिला म्हणजे निर्दोष आहोत असे होत नाही – प्रवीण दरेकर
महाराष्ट्रासह महाराष्ट्र सरकारची अब्रु वेशीला टांगल्यानंतर २० दिवस उलटून गेल्यानंतर ही तुम्ही या प्रकरणात निर्णय घेऊ शकत नाही. पण देर है दुरूस्त है. भाजपाने ज्या आक्रमकतेने भूमिका मांडली, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याशिवाय अधिवेशन सुरू करणार नाही. रस्त्यावर उतरलो आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा विजय झाला. या प्रकरणात राजीनामा घेतला परंतु, या प्रकरणात ज्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत आहे, त्यांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागणार. असे असले तरी पूजा चव्हाण हे प्रकरण या राजीनाम्यानंतर संपलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणाचा संजय राठोड यांचा कसा संबंध आहे किंवा नाही, याची चौकशी करणं आवश्यकच.. राजीनामा दिला म्हणजे निर्दोश आहोत असे होत नाही. तर संशयित म्हणून चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून येथे राजीनामा दिला आहे. मात्र आता भाजपाची मागणी अशी असेल की, FIR का दाखल करण्यात आला नाही, पूजा राठोड नेमकी कोण आहे? पोलिसांचा निष्काळजीपणा सरकारच्या दबावाखाली होता का? याचा तपास व्हावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button