आरोग्य

राज ठाकरेंवर ‘लिलावती’त शस्त्रक्रिया

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयात पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. टेनिस खेळताना राज ठाकरे यांना हाताला झालेल्या दुखापतीवेळी पाठीला देखील त्रास झाला होता. त्यामुळे पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. उद्या राज ठाकरेंना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. राज यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते आजच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

राज ठाकरे यांच्या कंबरेचा स्नायू दुखत होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास होत होता. राज ठाकरे 3 दिवसांपूर्वी उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यावर एमआरआयची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या कंबरेच्या स्नायुवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. राज ठाकरे यांना सकाळी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुपारी ३ च्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी कोरोनाच्या स्थितीवर चर्चा झाली होती. याच वेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कंबरेच्या त्रासाबद्दल विचारलं होतं. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज यांना लिलावती रुग्णालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत असे सुचवले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button