बंगालमध्ये प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरणार!
कोलकाता: प्रसिद्ध राजकीय रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षासाठी काम केले होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिलेली होती. त्यात त्यांनी भाजपला १०० पेक्षा कमी जागा मिळतील असा दावा केला होता. सध्याच्या कलांनुसार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरताना दिसताना आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी आपण भाजपला बंगालमध्ये १०० जागा जिंकण्यासाठीही संघर्ष करावा लागेल, या मतावर अजूनही ठाम असल्याचे सांगितले. मात्र, भाजपने पश्चिम बंगालची निवडणूक जिंकली तर देशात भाजपचा एकाधिकारशाही निर्माण होईल, असा इशारा प्रशांत किशोर यांनी दिला होता. पश्चिम बंगालमध्ये थेट लढत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रसचे कितीही नेते पक्ष सोडून गेले असले तरी त्याचा फटका ममता बॅनर्जींना बसणार नाही, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला होता.