Top Newsराजकारण

राज्यात आतापर्यंत २०५३ एसटी कर्मचारी निलंबित

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभरातील एसटी सेवा ठप्प झाली आहे. अनेक एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले असून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चांगलेच चिघळले आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाई करण्यात आली असून, राज्यात आज तब्बल १ हजार १३५ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर राज्यात आतापर्यंत २ हजार ५३ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सांगली,सोलापूर, रत्नागिरी,औरंगाबाद अशा अनेक जिल्ह्यातील एसटी डेपोमधील एसटी कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावी अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. आज पुण्यातून सर्वाधिक कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्याची माहिती समोर येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. कोर्टाने देखील कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर ठरवला आहे. कामगार राजकीय बळी ठरले आहे आणि हे दुर्देवी असल्याचे अनिल परब यांनी म्हटले. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची भाषा करत असतानाच आता सरकार एसटी कर्मचाऱ्यांना नोटीसा पाठवून त्यांचे निलंबन करत आहे. मागील ४-५ दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप चांगलाच चिघळला आहे त्यात एसटी महामंडळ सातत्याने कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा तगादा लावला आहे.

गुरुवारी एसटी कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची या संदर्भात भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात त्यांनी मध्यस्थी करावी अशी विनंती यावेळी राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मी मध्यस्थी करेन पण एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नका असे आवाहन राज ठाकरे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button