शिक्षण

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची १९ जुलैपासून ऑनलाईन नोंदणी

मुंबई : राज्य मंडळाचा दहावीचा निकाल लागला. दहावीच्या निकालानंतर मुलांची सीईटी परीक्षांची तयारी सुरु होते. अकरावी सामायिक प्रवेश परीक्षांची (सीईटी) तारीख बोर्डाकडून जाहीर करण्यात आली असून अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची ऑनलाईन नोंदणी येत्या १९ जुलै म्हणजेच सोमवारपासून सुरु होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.

राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचा अर्ज उपलब्ध आहे. अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा ही ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे घेण्यात येणार असून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षा ही राज्य मंडळामार्फत घेण्यात येणार आहे. सीईटी परीक्षांचे अर्ज राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य असतील. तर इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना यासाठी शुल्क आकारण्यात येईल अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

ऑनलाईन नोंदणी कशी कराल?

राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर जा. विद्यार्थ्यांचा दहावीचा आसन क्रमांक टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येईल. तिथे दहावीच्या निकालाचे गुण अपडेट केलेले असतील. त्यानंतर पुढे तुमच्यासमोर परीक्षेसाठी इच्छुक आहात का? किंवा नाही असे दोन पर्याय समोर येतील. योग्य पर्याय निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.

सीईटी परीक्षांचे स्वरुप कसे असेल?

सीईटी परीक्षा या अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येतात. मात्र ही वैकल्पिक म्हणजेच पर्यायी परीक्षा आहे. यात विचारले जाणारे प्रश्न हे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. ही परीक्षा ओएमआर पद्धतीची असते. एकूण १०० गुणांच्या परीक्षेत बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. परीक्षा देण्यासाठी २ तासांचा कालावधी देण्यात येतो. सीईटी परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारे अकरावी प्रवेश प्रक्रियेला प्राध्यान्य देण्यात येते. त्याचप्रमाणे सीईटी परीक्षांच्या गुणांच्या आधारे कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button