साई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे

शिर्डी : साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ अखेर जाहीर करण्यात आलं आहे. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी लागली आहे, तर उपाध्यक्षपदी अॅड. जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
विश्वस्त मंडळ : आमदार आशुतोष अशोकराव काळे (अध्यक्ष), अॅड. जगदीश हरिश्चंद्र सावंत (उपाध्यक्ष), अनुराधा गोविंदराव अदिक, अॅड. सुहास जनार्दन अहेर, अविनाश अप्पासाहेब धनवटे, सचिन रंगराव गुजर, राहुल कनाल, सुरेश गोरक्षनाथ वाबळे, जयंतराव पुंडलिकराव जाधव, महेंद्र गणपतराव शेळके, एकनाथ भागचंद गोंदकर, सभापती, शिर्डी नगर पंचायत (सर्व सदस्य)
६ जागा शिल्लक
साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळात एकूण १७ सदस्य असतात. त्यातील तात्पुरत्या स्वरूपात ११ अशासकीय सदस्य नियुक्त केले गेले आहेत. यात राष्ट्रवादीच्या ५, काँग्रेसच्या ४ आणि शिवसेनेच्या २ जणांचा समावेश आहे. अद्याप ६ जणांची नियुक्ती शिल्लक आहे. त्यात शिवसेनेचे ३, काँग्रेसचे २ आणि राष्ट्रवादीचा १ सदस्य असेल.




