अंबानी प्रकरणात ‘एनआयए’चे महासंचालक योगेश मोदीही तपास करणार
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह आढळून आलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएने आपले फास आणखी आवळण्यास सुरुवात केली आहे. सचिन वाझे यांना ताब्यात घेतल्यानंतर आता मुंबई पोलिसांमधील अनेक मोठे अधिकारी एनआयएच्या रडारवर असून त्यांची चौकशी योगेशचंद्र मोदी करणार असल्याचे समजते आहे.
सध्या एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझे हे चौकशीमध्ये एनआयएच्या अधिका-यांना योग्य प्रमाणात सहकार्य करीत नसल्याचे समजत आहे. तसेच एवढा मोठा कट रचणा-या वाझेंना वरिष्ठ अधिका-यांचा पाठिंबा असल्याशिवाय ते शक्य नाही, असा एनआयएच्या तपास अधिका-यांचा कयास आहे. वरिष्ठ अधिका-यांना योग्यप्रकारे समजावून त्यांच्याकडून या प्रकरणाचा उलगडा व्हावा यासाठी मोदी यांची गरज असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझेंच्या चौकशीचे काम पोलिस अधिक्षक दर्जाचे अधिकारी विक्रम खलाटे करीत आहे. मात्र मुंबई पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिका-यांची चौकशी करण्यासाठी मोदी हेच करतील असे सुत्रांकडून सांगितले जात आहे.
योगेश चंद्र मोदी हे १९८४ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना झालेल्या गोध्रा दंगलीत झाल्या. त्यावेळी योगेश चंद्र मोदी हे पोलिस दलात होते. त्यांनी नरेंद्र मोदींना या दंगलप्रकरणी दोषमुक्त होण्यासाठी मदत केली होती, असे आरोप त्यांच्यावर होत होते. गोध्रा दंगलीत घडलेल्या गुलबर्ग सोसायटी, नरोडा गाव, नरोडा पाटिया येथील घटनांमध्ये नरेंद्र मोदी यांना दोषी ठरविण्यासाठी अनेक दुवे होते. मात्र त्याठिकाणी योगेश चंद्र मोदी यांनी केलेल्या तपासामुळे नरेंद्र मोदी यांना न्यायालयात क्लीन चिट मिळवण्यात यश आले होते. योगेश चंद्र मोदी यांच्या कार्याची परतफेड म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर २०१९ साली एनआयएच्या महासंचालकपदी त्यांची वर्णी लावण्यात आली होती. मे २०२१ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार आहे