स्पोर्ट्स

मेजर ध्यानचंद यांचे पुत्र बृजमोहन सिंह यांचे निधन

मुंबई : कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवर हिरावल्याची बातमी दोनच दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यातच आता कोरोनामुळे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे पुत्र बृजमोहन सिंह यांचे निधन झाल्याची बातमी समोर आल्याने क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. बृजमोहन हे ध्यान चंद यांच्या ७ मुलांपेकी सर्वात ज्येष्ठ होते. बृजमोहन यांच्या निधनाबाबत त्यांचे भाऊ अशोक कुमार यांनी माहिती दिली आहे. बृजमोहन ८२ वर्षांचे होते, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.

अशोर कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आमचा मोठा भाऊ एक महिन्यापूर्वी कोरोनातून बरा झाला होता आणि तो पूर्णपणे ठीक होता. त्याला इंग्रजी चित्रपट खूप आवडायचे. काल रात्रीसुद्धा त्याने एक इंग्रजी चित्रपट पाहिला. त्यानंतर आज सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेला आणि परत आला. घरी आल्यानंतर तो ज्यूस प्यायला. त्यानंतर तो बाथरूममध्ये गेला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button