राजकारण

परीक्षेबाबत निर्णय घेण्यात एमपीएससी प्रशासन कमी पडले : अजित पवार

विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी

पुणे : राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० पुढे ढकल्याने MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुणे, कोल्हापूर,नाशिक, नागपूरमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केली. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आंदोलन करायची वेळ आली हे दुर्दैवी आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांना अशा प्रकारे रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ येता कामा नये यासाठी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. २१ मार्चनंतरच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच घेण्यात येतील. एमपीएससी प्रकरणी राजकारण करणं योग्य नाही. राज्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकल्यामुळे जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, एमपीएससीने प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवे होते, परंतु एमपीएससी परीक्षेबाबत निर्णय घेण्यात कमी पडली असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

एमपीएससीच्या परीक्षेत राजकारण आणायचे काही कारण नाही. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. यामध्ये काहींनी राजकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सरकारचा पाठींबा आहे परंतु दिशाभूल करण्याचा प्रयत्न काल झाला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीला सांगून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. अभ्यास सुरु ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अंतिम आहे आणि त्यांच्या निर्णयाला आमचे समर्थन आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे ते नको त्या मागण्या करतील असा टोला विरोधकांना लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button