राजकारण

मोदी-शहा काही अजिंक्य नेते नाहीत; संजय राऊतांचा टोला

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी हॅटट्रिक साधत दणदणीत विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मोठे नेते आहे, पण अजिंक्य नाहीत, हे आज बंगालच्या जनतेनं दाखवून दिलं, अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

‘पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला फक्त बहुमत मिळाला नाही, तर प्रचंड बहुमत मिळालं आहे. ममता बॅनर्जी यांना १२५ जागा सुद्धा मिळणार नाही, निकालानंतर ममतादीदी घरी जातील असं वातावरण निर्माण केलं गेलं होतं. पण ममतादीदींनी आपण कोण आहोत, हे दाखवून दिलं आहे. जिद्द काय असते हे ममतादीदींकडून शिकण्यासारखं आहे’ असं कौतुक करत संजय राऊत यांनी ममतादीदींचं अभिनंदन केलं आहे.

‘ममतादीदी नंदीग्राम मतदारसंघामधून सुद्धा जिंकतील. यात शंका नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अजिंक्य नेते नाही, पण मोठे नेते आहेत. निवडणूक जिंकण्याचे तंत्र त्यांच्याकडे आहे. सत्ता आहे. पण ते अजिंक्य नाहीत, हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीतून दिसून आलं आहे’ असा टोलाही राऊत यांनी लगावला.

‘बेळगावमध्ये आम्ही मराठी माणसासाठी मैदानात उतरलो होतो. आम्ही त्यांच्यासाठी लढलो. निकाल काय लागतो हे नंतर पाहू, पण मराठी माणसं या निमित्ताने एकत्र आली, असंही राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button