इतर

मनसे पदाधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सटाणा-साक्री रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कारमध्येच त्यांनी डोक्यात गोळी झाडून जीवनयात्रा संपवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सटाणा साक्री रोडवर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नंदू ऊर्फ नंदलाल गणपत शिंदे (वय ५५) असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. नंदू शिंदे हे मनसेचे पदाधिकारी होते. तसंच ते महिंद्रा अँड महिंद्रामधील युनियनचे माजी पदाधिकारी देखील होते. नंदू शिंदे हे आपल्या स्कोडा कार (MH 15 FT 0133) ने नाशिककडे जात होते. ताहराबाद रोडवरील यशवंतनगर इथं पोहोचल्यावर त्यांनी गाडी थांबवली. त्यानंतर आपल्या मावस भावाला फोन केला. ‘मी गाडी चालवण्याच्या मनस्थितीत नाही. मी सटाण्याजवळ असलेल्या जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा आहे, असं त्यांनी सांगितले. त्यानंतर मावस भाऊ आणि इतर नातेवाईक हे नंदू शिंदे यांच्याकडे पोहोचले पण तोपर्यंत उशीर झाला होता. समोरच्या सीटवर नंदू शिंदे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारच्या समोरच्या सीटवरच नंदू शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे. नंदू शिंदे हे उद्योजक होते, त्यांनी अचानक उचलेल्या टोकाला पावलामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button