आरोग्य

केंद्र सरकारने कनेक्टर न पाठविल्याने नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर!

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्य सरकारने व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजनचा पुरवठा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भागवण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला ६० व्हेंटिलेटर पीएम केअर फंडातून पाठवले होते, परंतु या व्हेंटिलेटरचे कनेक्टर पाठवले नसल्याचे आढळून आले आहे.

नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. नाशिकमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. व्हेंटिलेटर, आयसीयू आणि ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडून वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून १० व्हेंटिलेटर नाशिक महापालिकेला पाठवले होते. परंतु हे ६० व्हेंटिलेटर कनेक्टरशिवाय पाठवले असल्यामुळे गेल्या १० दिवसांपासून धूळ खात पडले आहेत. नितांत गरज असताना व्हेंटिलेटर पडून असल्यामुळे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर निशाणा साधत मोदी सरकारच्या योजना व कौशल्य व्यवस्थापनाचे कौतुक करावे तेवढे कमी असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे. केंद्र सरकारने १० दिवसांपूर्वी पीएम केअर फंडमधू ६० व्हेंटिलेटर नाशिक महापालिकेला पाठविले आहेत. परंतु हे व्हेंटिलेटर कनेक्टरशिवाय पाठवण्यात आल्यामुळे वापरण्यात आले नाही. व्हेंटिलेटरची गरज असताना हा हलगर्जीपणा अपेक्षित आहे का? मोदी सरकारच्या योजनांचे व व्यवस्थापनाचे कौतुक आहे. असे ट्विट करत सचिन सावंत यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button