अर्थ-उद्योग

नेटवर्क अ‍ॅडव्हर्टायझिंगच्या डिजिटल विभागाच्या उपाध्यक्षपदी मनन शहा

मुंबई : नेटवर्क अ‍ॅडव्हर्टायझिंगच्या डिजिटल विभागाच्या उपाध्यक्षपदी मनन शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनन यांनी चिम्पअँडझेड इंक या कंपनीतून नेटवर्कमध्ये प्रवेश केला आहे. तेथे ते कंपनीच्या भारतातील व्यवसायासाठी पीअँडएलची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी कॉन्व्होनिक्स या कंपनीपासून करिअरला सुरुवात केली. तेथे त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, रिलायन्स डिजिटल, जिओ, कोटक सिक्युरिटीज अशा अनेक मोठ्या ब्रँडसाठी डिजिटल मार्केटिंगची कौशल्ये आत्मसात केली.

त्यांची पार्श्वभूमी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची असल्याने त्यांनी टेक विश्वामध्ये स्वतःच्या स्टार्ट-अपची सुरुवात करण्यासाठी साडेचार वर्षांनी कॉन्व्होनिक्स सोडायचे ठरवले. त्यांनी एआय व मशीन लर्निंग यांचा वापर करून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारत, व्यापक स्तरावरील कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रकल्प साकार करण्यासाठी काम केले. त्यानंतर ते अॅडलिफ्टची मुंबईतील शाखेचे नेतृत्व करायचे ठरवले आणि तेथे टाटा एआयजी, फ्युच्युर जनराली, आयसीआयसीआय लोम्बार्ड, आयसीआयसीआय एचएफसी, महिंद्रा अॅग्री-गुरू, अॅक्सिस बँक अशा ब्रँडच्या डिजिटल गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

मनन यांनी सांगितले, “नेटवर्क ही खऱ्या अर्थाने एकात्मिक एजन्सी असून कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे. व्यवसायातील समस्या सोडवतील, असे काम करण्यासाठीची कंपनीची बांधिलकी आणि ख्याती यामुळे डिजिटल माध्यमाशी निगडित असलेल्या सद्यस्थितीला आव्हान देणे शक्य होते. कंपनीच्या डिजिटल टीमचे नेतृत्व करण्याची आणि नेटवर्कच्या वाटचालीमध्ये योगदान देण्याची सुवर्णसंधी मला मिळाली आहे.”

नेटवर्क अ‍ॅडव्हर्टायझिंगचे व्यवस्थापकीय संचालक विनोद नायर यांनी नमूद केले, “आम्ही ग्राहकांना देत असलेल्या सेवांमध्ये डिजिटल कम्युनिकेशन बिझनेस हा मूलभूत घटक आहे. आमच्या डिजिटल बिझनेसला नवी दिशा व चालना देण्यासाठी, मनन ही योग्य निवड आहे, असे आम्हाला वाटते. त्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमता व दृष्टिकोन त्यांच्यामध्ये आहे, असे आम्हाला वाटते. नेटवर्क टीममध्ये त्यांचे स्वागत आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button