Top Newsराजकारण

पंजाबमध्ये काँग्रेसच्या ८६ उमेदवारांची यादी जाहीर; सोनू सूदची बहिणीलाही उमेदवारी जाहीर

काँग्रेसने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ८६ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. चमकौर साहिबमधून सध्या पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, अमृतसर पूर्वेकडून नवजोत सिंह सिद्धू आणि मोगामधून सोनू सूदची बहीण मालविका सूद यांना काँग्रेसचे तिकिट मिळाले आहे. तर खासदार प्रताप सिंह बाजवा कादियानमधून आणि गायक सिद्धू मूसवाला मानसामधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय गृहमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांना डेरा बाबा नानकचे तिकिट दिले आहे, तर पंजाबचे उपमुख्यमंत्री ओम प्रकाशी सोनी यांना अमृतसर सेंट्रलमधील रिंगणातून बाहेर करण्यात आले आहे.

काँग्रेस पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सुजानपूहून नरेश पुरी, पठानकोटहून अमित विज, गुरदासपूरहून बरिंदरजीत सिंह, श्रीहरगोविंदपूरमधून मनदीप सिंह, डेरा बाबा नानकमधून सुखजिंदर सिंह रंधावा, राजा सांसीमधून सुखविंदर सिंह सरकारिया आणि अमृतसर उत्तरमधून सुनील यांना तिकिट मिळाले आहे.

अमृतसर पश्चिमेतून राजकुमार, अमृतसर सेंट्रलतून ओमप्रकाश सोनी, अमृतसर पूर्वतून नवजोत सिंह सिद्धू, अमृतसर दक्षिणेतून इंदरबीर सिंह बोलारिया, तरन तारनतून डॉक्टर धर्मवीर अग्निहोत्री, कपूरथलातून राणा गुरजीत सिंह आणि सुलतानपूर लोधीतून नवतेज सिंह चीमा काँग्रेसच्या रिंगणातून लढणार आहेत.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचेही चांगले वर्चस्व आहे. त्यामुळे, आपच्या यादीकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात सुरक्षा यंत्रणेत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री चन्नी यांना टार्गेट करण्यात आलंय. त्यामुळेच, यंदाच्या पंजामधील निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले आहे. तसेच, पंजाबमधील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमारेषेवर केलेल्या आंदोलनामुळेही येथील शेतकरी कोणाच्या बाजुने मत टाकणार हे पाहण्याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर मतदानाची मोजणी १० मार्चला होणार आहे. २०१७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले होते. काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या होत्या. तर २० जागा जिंकून आम आदमी पार्टी दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरली होती. शिरोमणी अकाली दलला १५, तर भाजपला फक्त ३ जागा मिळाल्या होत्या. पंजाब विधानसभेत १७७ जागा आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button