फोकस

हिमाचलमध्ये ४० जणांना घेऊन जाणाऱ्या बसवर कोसळली दरड !

किन्नौर (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. दरड कोसळण्याच्या घटनेत अनेक वाहने आणि ४० प्रवासी घेऊन जाणारी बस गाडली गेल्याचे किन्नौर जिल्ह्याचे उपायुक्त अबीद हुसेन सादिक यांनी सांगितले. दोन जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून काढण्यात आले आहेत. अद्याप घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेली बस ही हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची होती. या बसमध्ये ४० प्रवासी होते. ही बस किन्नौरमधील रेकाँग पीओवरून शिमलाच्या दिशेने जात होती. मदकार्यासाठी सैन्यदलाच्या राष्ट्रीय आपत्कालीन कृती दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक बचाव पथकाला बोलाविण्यात आल्याचे उपायुक्त अबीद हुसेन सादिक यांनी सांगितले. दरड कोसळत असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.

किन्नौर जिल्ह्यातील निगुलसेरी येथे राष्ट्रीय महामार्ग-५ वरील चील जंगलजवळ भूस्खलन होऊन ही दुर्घटना घडली आहे. भूस्खलनादरम्यान, कड्यावरून मोठ्या प्रमाणात दगडमातीचा ढिगारा खाली आल्याने अनेक वाहने खाली दबली आहेत. एचआरटीसीच्या बसमध्ये किती प्रवासी होते हे, समजू शकलेले नाही. अपघात झाल्यानंतर बस कड्यावरून खाली कोसळल्याचे सांगण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र याबाबत केवळ काही माहिती मिळाली आहे. बससोबतच काही इतर वाहनेही खाली दबली आहेत. एनडीआरएफच्या टीमलाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. तसेच पोलीस आणि प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button