जॅकेट आणि कोरोना; अजित पवारांच्या कोपरखळ्यांनी विधान परिषदेत हास्याचा धबधबा…
मुंबई : विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपालांच्या अभिभाषणावर वक्तव्य केले यावेळी अजित पवार यांनी राज्यातील सर्वच प्रश्नांवर विरोधकांना उत्तर दिले तसेच त्यांच्या बिनधास्त वक्तव्याने विरोधकांवर बोलताना सभागृहाला खळखळून हसवले आहे. कोरोना परिस्थितीवर वक्तव्य करताना चिंता व्यक्त केली आहे तेसच राजकीय नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना कोरोना नाही झाला, प्रवीण दरेकरांना कोरोना नाही झाला सभापती महोदयांना नाही झाला मला(अजित पवार) झाला, देवेंद्र फडणवीसांना झाला परंतु तुमच्या जाकिटामुळे कोरोना झाला नसेल अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दरेकरांना लगावली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत राज्यापालांच्या अभिभाषणावर आणि राजकीय प्रश्नांवर बोलत होते. एक गोष्टीचे विशेष वाटत की मुख्यमंत्र्यांना, प्रवीण दरेकरांना, सभापती महोदयांना कोरोना नाही झाला. मला झाला, फडणवीसांना झाला तुमची रोगप्रतीकारक शक्ती चांगली असावी म्हणुन तुम्हाला झाली नसावी किंवा तुमचे जाकिट बघुन तो जवळ आलाच नसेल किंवा म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरायचं असे काही असेल तर माहित नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. परंतु तुम्हाला कोरोना होऊ नये अशा शुभेच्छा माझ्या तुम्हाला शुभेच्छा असतील नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणाल तुझीच दृष्ट लागली म्हणून कोरोना झाला. असे माझ्या नावावर पावती फाडू नका असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना कोपरखळी लगावल्यानंतर एकच हशा पिकला होता. यावेळी मागून एका सदस्याने प्रसाद लाड यांनी ज्यांना ज्यांना जॅकेट दिलं त्यांना कोरोना झाल्याचं म्हटले यावर अजित पवार यांनी म्हटले की प्रसादने म्हणजेच आमदार प्रसाद लाड यानी मलाही जॅकेट दिलं होतं असे म्हणताच पुन्हा सभागृहात एकच हशा पिकला होता.