राजकारण

सोनिया, राहुल गांधींचा अवमान; मुंबईत काँग्रेसकडून ‘स्टोरीया फूड्स’च्या कार्यालयाची तोडफोड

मुंबई : स्टोरीया फूड्स या कंपनीने एक जाहिरात बनवलेली आहे, ज्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य दाखवले गेले आहे. त्याच्या निषेधार्थ स्टोरीया फूड्स या कंपनीच्या ऑफिसमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाई जगताप यांच्या नेतृत्वात तोडफोड केली.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या आदेशानुसार मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस व युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी पूर्व येथील स्टोरीया फूड्सच्या कार्यालयाची आज तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती देताना भाई जगताप म्हणाले की आमचे नेते आदरणीय राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल जाहिरातीत आक्षेपार्ह दाखविण्यात आले. ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांना आम्ही चांगलाच धडा शिकवलेला आहे. ही जाहिरात ताबडतोब बंद झाली पाहिजे आणि स्टोरीया फुड्स कंपनीने जाहीररीत्या माफी मागावी अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन मुंबई काँग्रेस करेल. स्टोरीया फुडसचे कार्यालय आम्ही बंद पाडू, असा इशारा भाई जगताप यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button