तंत्रज्ञान
भारताचे मोठे यश, ‘अग्नि-प्राइम’ मिसाईलची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आज आणखी एक मिसाईलची भर पडली आहे. भारतानं सोमवारी ओडिशाच्या किनाऱ्यावर अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्नी-प्राइम मिसाईलची २ हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. याशिवाय इतर मिसाईलपेक्षा अग्नि-प्राइम मिसाईल लहान आणि वजनानं हलकी आहे. अत्याधुनिक पद्धतीनं मिसाईल डिझाइन करण्यात आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं अग्नि-प्राइम मिसाईलची यशस्वी चाचणी झाल्याबाबतचं वृत्त दिलं आहे. यासंदर्भातील एक ट्विट एएनआयनं केलं आहे.




