Top Newsस्पोर्ट्स

कानपूरमध्ये आजपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना

कानपूर : टी-२० मालिकेत भारताने न्यूझीलंडवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ३ टी-२० सामन्याची मालिका सहज जिंकली. आता अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्या कर्णधारपदाची कसोटी लागणार आहे. या दोघांवर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपसह कसोटीत नंबर वन होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची जबाबदारी असेल. कानपूर कसोटी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळली जाईल, तर मुंबई कसोटीत संघ विराटच्या नेतृत्वात खेळेल. भारताने या दोन्ही कसोटी जिंकल्या तर कसोटीतील नंबर वन संघ बनण्याच्या दिशेने वाटचाल ठरु शकते.

दरम्यान, उभय संघांमधील पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये आजपासून (गुरुवार) खेळवला जाणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ग्रीन पार्क स्टेडियमवर हा कसोटी सामना खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी कर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि मयंक अग्रवाल आणि इतर काही खेळाडूंनी ७ दिवस मुंबईत सराव केला. त्यानंतर हे खेळाडू दोन दिवसांपूर्वी कानपूरमध्ये दाखल झाले आहेत. बुधवारीही भारतीय संघाने नेट्समध्ये बराच वेळ सराव केला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबरपासून (गुरुवार) सुरू होणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीनपार्क क्रिकेट स्टेडियमवर सकाळी ०९.३० वाजता सुरू होणार आहे. नाणेफेक ९ वाजता होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल. Disney+Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह सामना ऑनलाइन पाहता येणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण. सूर्यकुमार यादव

न्यूझीलंडचा कसोटी संघ : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविले, टिम साउथी, रॉस टेलर, विल यंग, ​​नील वॅगनर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button