Top Newsइतरस्पोर्ट्स

इंग्लंडसमोर भारताचे ३७१ धावांचे आव्हान

ऋषभ पंतचे दोन्ही डावात ऐतेहासिक शतक

लंडन : अँडरसन-तेंडुलकर चषकातील पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या उपकर्णधार ऋषभ पंतने इतिहास रचला. सोमवारी त्याने इंग्लंडमध्ये कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचा मान पटकावला. ९३ वर्षांच्या भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात हे अभूतपूर्व यश आहे. दरम्यान, टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यात विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडे पहिल्या डावात ६ धावांची आघाडी होती. तर ऋषभ पंत आणि केएल राहुल या जोडीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुस-या डावात सर्व बाद ३६४ धावा केल्या.

ऋषभ पंतने लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात १३४ धावांची झुंजार खेळी खेळली, तर दुस-या डावातही त्याने जबरदस्त शतक ठोकले. इंग्लंडमधील हे त्याचे एकूण चौथे कसोटी शतक ठरले आहे. विशेष म्हणजे या कसोटीत भारताकडून एकूण पाच शतके झळकली आहेत. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल (पहिला डाव), केएल राहुल (दुसरा डाव) यांनी प्रत्येकी एक आणि पंतने दोन्ही डावात शतक झळकावले.

कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा ऋषभ पंत सातवा भारतीय फलंदाज बनला आहे. याआधी सुनील गावसकर (३ वेळा), राहुल द्रविड (२ वेळा), विजय हजारे, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनीही हे यश मिळवले आहे.

इंग्लंडसमोर ३७१ धावांचे आव्हान

इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यात विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान आहे. मंगळवारी सामन्याचा शेवटचा दिवस असून भारत मजबूत स्थितीत आहे. आता भारतीय गोलंदाजांवर सर्व जबाबदारी असणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात ४६५ रन्स केल्या. भारताने अशाप्रकारे ६ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर टीम इंडियाने तिस-या दिवशी दुस-या डावाला सुरुवात केली. पहिल्या डावात १०१ धावा करणारा यशस्वी जयस्वाल दुसऱ्या डावात ४ धावांवर बाद झाला. कसोटी पदार्पण करणारा साई सुदर्शन याने ३० धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कर्णधार शुबमन गिल यालाही पहिल्या डावाची पुनरावृत्ती करता आली नाही. शुभमन ८ धावा करुन बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाची ३ आऊट ९२ अशी स्थिती झाली. त्यानंतर ओपनर केएल राहुल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या जोडीने चौथ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत याने या या सामन्यात सलग दुसरे शतक झळकावले. पंत ११८ धावा करुन बाद झाला. तर पहिल्या डावात ४२ धावा करुन माघारी परतलेल्या केएल राहुलने दुस-या डावात शतक केले. त्याने १३७ धावा केल्या. राहुल बाद झाल्याने टीम इंडियाची
इथून इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमबॅक केले आणि टीम इंडियाला झटक्यावर झटके देत ऑलआऊट केले. टीम इंडियाने शेवटच्या ६ विकेट्स या अवघ्या ३१ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. त्यामुळे टीम इंडिया ४०० धावांचे आव्हान ठेवण्यात अपयशी ठरली. इंग्लंडला अशाप्रकारे ३७१ रन्सचे आव्हान मिळाले. आता दोघांपैकी कोणता संघ हा सामना जिंकून विजयी सलामी देते, हे सामन्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button