इतर

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महामार्गांवरील टोल दरात वाढ

पुणे : नेमेची येतो उन्हाळा,पावसाळा ,हिवाळा या धर्तीवर नेमेची होते टोल दरवाढ हे नित्याचे झाले आहे. टोलमुक्त महाराष्ट्र हे मृगजळच राहिले आहे, हेच या नवीन टोल दरवाढीतून स्पष्ट होत आहे. दरवर्षी 1 एप्रिल आला की टोलवाढ (Toll Plaza) होते तशी यंदाही झाली आहे. पुणे-सातारा (Pune-Satara Highway) रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम साडेदहा वर्षे रखडूनही कायम वाहतूक कोंडी ,अपघात होऊनही कंत्राटदाराला 5 टक्के टोल वाढीचे बक्षीस देण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर 2010 ला पुणे-सातारा रस्ता 6 पदरी करण्याचं काम सुरू झालं. 31 मार्च 2013 ला हे काम संपणे अपेक्षित होते, मात्र अद्याप काम अर्धवट आहे.

या मार्गावर खेड शिवापूर आणि आनेवाडी असे 2 टोल नाके आहेत. आजपासून खेड शिवापूर टोल नाक्यावर हलकी वाहने असतील तर एकेरी प्रवासाकरता 100 रुपये तर दुहेरी प्रवास (रिटर्न टोल) 150 रुपये पडतील. हलकी व्यावसायिक वाहने असतील तर हेच दर अनुक्रमे 160 आणि 240 रुपये असतील. बस किंवा ट्रक करता 340 ,505 इतका टोल असेल. मल्टी अ‍ॅक्सल वाहनांना एकेरी प्रवासाकरता 530 तर दुहेरी प्रवासाकरता 795 रुपये टोल असेल.

आनेवाडी टोल नाक्याला मोटारी, हलकी वाहने यांना एकेरी प्रवासाकरता 70 तर दुहेरी प्रवासाकरता 105, हलक्या व्यावसायिक वाहनांना अनुक्रमे 110 आणि 170, बस किंवा ट्रककरता 235 आणि 350 तर मल्टी अ‍ॅक्सल वाहनांना एकेरी प्रवासाकरता 365 तर दुहेरी प्रवासाकरता 550 रुपये टोल द्यावा लागणार आहे.

पुणे-नाशिक रस्त्यावर टोल दर वाढले

पुणे-नाशिक रस्त्यावर चाळकवाडी आणि हिवरगाव तोल नाक्यावरही यंदा टोल दर वाढले आहेत. चाळकवाडी नाक्यावर हलकी वाहने 4, मोटारी यांना एकेरी प्रवासाकरता 45 रुपये , दुहेरी प्रवासाकरता 70 तर बस किंवा ट्रकला 160 आणि 240 रुपये इतका टोल भरावा लागणार आहे.

पुणे-सोलापूर रस्त्यावरही टोलवाढ

पुणे-सोलापूर रस्त्यावरील पाटस टोलनाका इथं मोटारी ,हलकी वाहने याकरता एकेरी प्रवासा करता 75 तर दुहेरी प्रवासा करता 115 रुपये टोल द्यावा लागेल. सरडेवाडी टोल नाक्याला मोटारी ,हलकी वाहने यांना एकेरी प्रवासाकरता 80 तर दुहेरी प्रवासा करता 120 टोल भरावा लागेल. बस किंवा ट्रक करता टोलचे दर एकेरी प्रवासाकरता 255 आणि दुहेरी प्रवासाकरता 380 रुपये असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button