राजकारण

भारतनाना माफ करा, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली!

पंढरपूर : “भारतनाना माफ करा, पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली. यात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा 3733 मतांनी विजय झाला. यानंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करत याबाबतची प्रतिक्रिया दिली.

भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले, असे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button