शिक्षण

बारावीची परीक्षा २३ एप्रिल, तर दहावीची २९ एप्रिलपासून; वेळापत्रक जाहीर

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत असताना राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे.

महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक १६ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते.

या संभाव्य वेळापत्रकावर संघटना, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षण तज्ज्ञांकडून सूचना मागवआल्या होत्या. त्यावर आलेल्या सूचनांचे अवलोकन करून मंडळाने संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळामार्फत शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button