
संपूर्ण झांजवड गाव भीतीच्या छायेत… गावाचे पुनर्वसन अत्यंत आवश्यक
नागरिकांची शेती वाहून गेली, संपूर्ण गाव दरडीच्या धोक्याच्या पातळीवर…अडीच तास डोंगर भागातून दरडीतून खाली पाई चालत जात अखेर मदत केली… महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानची ( ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान संलग्न) महाबळेश्वर तालुक्यातील पूरग्रस्त झांजवड गावात कपडे, धान्याची मदत…
झांजवड गाव… दरडीच्या भीतीत…
महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड गाव एका बाजूला मकरंद गड आणि उजव्या बाजूला प्रताप गड सह्याद्री डोंगर रांगांच्या डोंगर परिसरात गाव…गावाच्या बाजूने कोयना धरणाचे नदीचे पात्र… २२ जुलैला झालेल्या अतिमूसळधार पावसामुळे डोंगरावरून थेट पावसाच्या पाण्याबरोबर दरडी खाली आल्या त्या दरडीने शेती वाहून गेली, ६० फूट खोल विहीर संपूर्ण माती, दगडाने बुजून गेली. तर दुसरी १५ फूट खोल विहीरीत दरडी पडल्याने डोंगराच्या उतारावरील विहीर वाहून गेली.

दरवर्षी पावसाळ्यात ६० कुटुंबाचे गाव डोंगरातील साठलेले पानी झऱ्यामार्फत पाईपलाईन द्वारे विहिरीत साठा करून ठेवत होते. हे पाणी बाराही महिने गावातील कुटुंबाना पुरत होते. पण आता अतिवृष्टी झाली आणि विहिरीचे मोठे नुकसान झाले. यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न या गावात आहे, आता पावसाचे दूषित पाणी गरम करून नागरिक पित आहेत.

रस्ता वाहून गेला, गावातील संपर्क संपूर्ण तुटला, प्रतापगड- तापोळा- झांजवड रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला, यामुळे गावातील नागरिकांचा वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. आता २ किलोमीटर डोंगर चढून गावातील नागरिक घोडे, पारोल या मार्गे पायी चालत घरातील महत्वाचे सामान आणण्यासाठी ये-जा करत आहेत. घरातील गाई, म्हशी यांना चरण्यासाठी जागा राहिली नाही.
गावातील नागरिक थोडा तरी पाऊस पडला तरी भीतीच्या छायेत आहेत. यामुळे या झांजवड गावचे सरकारने पुनर्वसन करणे अत्यंत आवश्यक आहे. एक बाजूला कोयना नदीचे पाणी, तर दुसऱ्या बाजूला डोंगरावरून थेट खाली येणारे पावसाचे पाणी आणि गावाच्या पूर्वेला डोंगर कडा .. यामुळे डोंगरावरील दरड थेट खाली येत असल्याने माती, दरडी मुळे या गावाला मोठे नुकसान झाले आहे. आजूबाजूला दुधगाव, गोरोशी, चतुर्भेट, घोणसपूर ही गावे आहेत.

या झांजवड गावाला महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने डोंगर भागातून पाय वाटेने पाई चालत जात अडीच तास थेट खाली उतरत भेट देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, सल्लागार सदाशिव गारगोटे तसेच झांजवड गावातील संभाजी देवजी जाधव, रामचंद्र लक्ष्मण जाधव, प्रकाश तानाजी संकपाळ, विठ्ठल रखमाजी जाधव, बाबुराव नारायण जाधव, भगवान भिवाजी जाधव, काशिनाथ भिवाजी जाधव तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण, डॉ. राहुल घुले, राहुल शेळके, प्रीती मॅडम, सुनीता मॅडम, सुवर्णा मॅडम यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली तसेच प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतल्याने मदत गावापर्यंत पोहोचवण्यात यश आले.
अखेर ‘मदत हेच खरे जीवन’ याची अनुभूती आली.




