फोकस

हैतीमधील भूकंपातील बळींची संख्या १,२९७ वर

पोर्ट औ प्रिन्स : हैती शनिवारी भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. ७.२ इतक्या रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद झाली आहे. आतापर्यंत या भूकंपामुळे १ हजार २९७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ५ हजार ७०० जण जखमी झाले आहेत. याबाबत हैतीच्या नागरी संरक्षण एजन्सीचे संचालक जेरी चांडलरने सांगितले की, ‘सर्वाधिक मृत्यू देशाच्या दक्षिण भागात झाले आहेत.’ शनिवारी झालेल्या भूकंपामुळे अनेक शहर पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. यादरम्यान भूस्खलनामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. आधीच कोरोनामुळे हैतीच्या लोकांची परिस्थिती बिकट झाली असून आता भूकंपामुळे नागरिकांचा त्रास आणखीन वाढला आहे.

अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने सांगितले की, या तीव्र भूकंपाचे केंद्र राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून १२५ किलोमीटर अंतरावर होते. पुढच्या आठवड्याच्या सुरुवातील संकट अजून वाढू शकते, कारण तुफान ग्रेस सोमवार किंवा मंगळवारपर्यंत हैतीत पोहोचू शकते.

हैदीतील भूकंपाचे धक्के दिवसा आणि रात्री जाणवले. बेघर लोकं आणि ज्यांची घरे कोसळण्याच्या मार्गावर आहेत, त्यांनी रस्त्यावर उघड्यावर रात्र काढली. पंतप्रधान एरियल हेनरी म्हणाले की, ‘जिथली शहरे उद्धवस्त झाली आहेत आणि रुग्णालये भरली आहेत तेथे मदत पाठवली जात आहे.’ याआधीही हैती शहराने भूकंपाचा सामना केला आहे. २०१८ साली ५.९ तीव्रतेचा भूकंप हैदीमध्ये आला होता. त्यामध्ये १२ हून अधिक लोकं मृत्यूमुखी पडले होते. तसेच २०१० साली ७.१ तीव्रतेचा भीषण भूकंपात ३ लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button