Top Newsइतरशिक्षण

ज्येष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील यांचे निधन

व्यासंगी साहित्यिक व संपादक हरपल्याची शोकभावना

नाशिक : पुरोगामी विचारांचा सतत पाठपुरावा करणारे ज्येष्ठ साहित्यिक Senior Literary गोविंदा तुकाराम तथा गो. तु. पाटील (Go. Tu. Patil) यांचे रविवारी रात्री नऊच्या सुमारास निधन झाले. आज (सोमवार) येवला येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी साहित्यिक व संपादक हरपल्याची शोकभावना व्यक्त होत आहे.

गो. तु. पाटील यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे मूळगाव सूनसगाव खुर्द, ता.जामनेर असून, त्यांचे माध्यमिक शिक्षण कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ येथे बहिणीकडे झाले. त्यानंतर त्यांनी उच्चशिक्षण घेतले. याचवेळी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. तीच त्यांची कर्मभूमी झाली. नोकरी सांभाळतानाच त्यांनी ‘अनुष्टुभ’सारखे दर्जेदार नियतकालिक चालविले. स्तंभलेखन, संपादन, मुलांसाठी संतचरित्र लिहिणारे गो. तु. पाटील यांनी वि. वा. शिरवाडकरांच्या हयातीत ’नटसम्राट समीक्षा’ या पुस्तकांचे संपादन केले आहे. ’ओल अंतरीची’ ही त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे. चार दशके सांस्कृतिक विश्वात वावरणारे गो. तु. पाटील अजातशत्रू, व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जायचे. गेवराई (बीड), मालेगाव, येवला या ठिकाणी त्यांनी महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button