नागपूर : काही वेळापूर्वीच नवाब मलिकांना न्यायालयाने आठ दिवासांची कोठडी सुनवाली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दाऊद भारतातून टेरर फंडींग करतोय. आज ईडीने नऊ ठिकाणी सर्च केला. त्यातून अनेक लिंक बाहेर आल्या. त्यातलं एक प्रकरण नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. असे फडणवीस म्हणाले. कुठल्याही राजकीय पक्षाने ‘टेरर फंडिंग’चा निषेध केला पाहिजे. सर्वांनी एकत्र दाऊदविरोधात भूमिका मांडली पाहिजे. तसेच माझ्याकडे जी कागदपत्र होती ती मी ईडी आणि एनआयएला दिली आहेत. असेही फडणवीस म्हणाले आहेत. देशात यामुळे अतिशय चुकीचा संदेश जाईल की दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला सरकार वाचवतंय, असेही ते म्हणाले.
सध्या मलिकांच्या अटकेवरून जोरदार घमासान सुरू आहे. यावरूनच फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल चढवत ही अटक कायदेशीर आहे, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी दाऊदशी संबंधित काही तिखट सवाल महाविकास आघाडी आणि मलिकांना केले आहेत. नवाब मलिक यांनी घेतलेली जमीन बॉम्बस्फोटातील आरोपांकडून घेतलीय. त्यातला एक हसीना पारकरचा ड्राईव्हर आहे. जमीनीच्या मालकांनी सांगितलं पैसे नाही मिळाले. असा आरोप फडणवीसांनी केला आहे, तर इतर काही मुद्द्यावरूनही फडणवीसांनी जोरदार बॅटिंग केली.
या जमिनीसाठी आमच्यावर दबाव टाकला. केवळ अतिक्रण काढण्याकरता पॉवर ऑफ अॅटर्नी . मात्र आम्हाला एकही पैसा मिळाला नाही. ज्या ठिकाणी हे सौदे झाले. ज्या ठिकाणी हसीना पारकर सौदा करत होती. त्या लोकांची साक्ष आहे. हसीन पारकरला ५५ लाख दिल्याचे पुरावे ईडीकडे आहेत. ही जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिकांना मिळाली. यातले सगळे पैसे अंडरवर्ल्डला गेले. हजारो कोटी हसीना पारकर म्हणजे दाऊदला गेले. एखाद्या मंत्र्याने बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन का घेतली? हसीना पारकरशी व्यवहार का केला. या व्यवहारानंतर तीन वेळा बॉम्बस्फोट. जे लोकं बॉम्बस्फोट करतात अशा लोकांना पैसे देणे निंदनीय आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
ईडीने सर्वांचे जबाब घेतले आहेत. मूळ मालकांनी एकही पैसा मिळाला नाही असे सर्व सांगितले आहे. ईडीने केलेली कारवाई नियमानुसार आहे. अशा प्रकारे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि देशाचा दुष्मन दाऊच्या बहिणीशी व्यवहार कसा केला जाऊ शकतो. त्यामुळेच कोर्टाने त्यांना कस्टडी दिली आहे. हे अतिशय गंभीर आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने टेरर फंडिंग होण्याला निषेध केला पाहिजे. यात राजकारण केलं नाही पाहिजे, सर्वांनी एकत्र दाऊदविरोधात भूमिका मांडली पाहिजे, असेही ते म्हणाले.