Top Newsस्पोर्ट्स

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव

नवी दिल्ली : २००८ नंतर म्हणजेच १३ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. २००८ मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीरज हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा शनिवारी संपल्या. भारताची गोल्फपटू अदिती अशोक हिनं पदकाच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर दुपारच्या सत्रात कुस्तीपटू बजरंग पुनियानं कांस्यपदक नावावर केले. त्यानंतर सायंकाळी नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी केली. भालाफेकपटू नीरजनं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. १२५ वर्षांत अ‍ॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर हरयाणा सरकारनं त्याला ६ कोटी बक्षीस देण्याची घोषणा केली. बीसीसीआयनेही टोक्योतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याची घोषणा केली. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नीरज चोप्राचे कौतुक केले. ते म्हणाले, या सुवर्णक्षणाची देशवासीयांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती आणि संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे. नीरज चोप्रानं इतिहास घडवला.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसाठी रोख बक्षीस रक्कमेची घोषणा केली. बीसीसीआय सुवर्णपदक विजेत्या नीरजला १ कोटी, रौप्यपदक विजेत्या मीराबाई व रवी दहिया यांना प्रत्येकी ५० लाख, कांस्यपदक विजेते पी व्ही सिंधू, लवलिना बोरगोईन आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येकी २५ लाख व भारतीय पुरूष हॉकी संघाला १.२५ कोटी रुपये देणार आहे.

नीरज चोप्राला केंद्र सरकारकडून ७५ लाख, हरयाणा सरकारकडून ६ कोटी, पंजाब सरकारकडून २ कोटी, मणिपूर सरकारकडून १ कोटी, बीसीसीआयकडून १ कोटी, चेन्नई सुपर किंग्सकडून १ कोटी रुपयांचे बक्षिसे मिळणार आहे.

नीरज चोप्राला आनंद महिंद्रा यांच्याकडून मिळणार XUV 700

अ‍ॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूला पोडियम (अव्वल तिघांत) फिनिशमध्ये पाहण्यासाठी १२५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. नीरज चोप्राच्या ऐतिहासिक विजयानंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी नीरजला स्पेशल गिफ्ट देण्याचे जाहीर केले. एका ट्विटर युजरनं आनंद महिंद्रा यांना नीरजला Xuv700 गिफ्ट देण्याची मागणी केली. त्यावर महिंद्रा यांनी रिप्लाय दिला अन् त्यांनी त्यांच्या कंपनीतील दोन व्यक्तींना टॅग करून नीरजसाठी Xuv700 गिफ्ट म्हणून तयार करण्यास सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button