आरोग्य
राज्यात कोरोना चाचणीच्या दरात आणखी कपात

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. RTPCR चाचण्याचे दर आता 500 ते 800 रुपये. रुग्णाने लॅबमध्ये जाऊन टेस्ट केली तर 500 रुपये आकारले जाणार. लॅबने तपासणी केंद्रावरून नमुने जमा केल्यास 600 रुपये आणि रुग्णाच्या घरी जाऊन चाचणीसाठी नमुना घेतल्यास 800 रुपये आकारले जाणार. राज्य सरकारने वेळोवेळी कोरोनाच्या चाचणीच्या दरात कपात केली आहे.