आरोग्य

लहान मुलांसाठी पहिल्यांदाच कोरोनाची नियमावली जारी

मुंबई : देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती सतत नियंत्रणाबाहेर जात आहे. दररोज ३ लाखाहून अधिक नवीन संक्रमित केसेस समोर येत आहेत, तर दररोज हजारो लोकांना मृत्यू होत आहे. परंतु संसर्गाच्या या दुसर्‍या लाटेत आणखी एक धोका दिसतो आहे. मुलांमध्ये कोरोना इन्फेक्शनचा धोका वाढला आहे. कोरोना विषाणूच्या या दुसर्‍या लाटेत, मोठ्या संख्येने मुले देखील संक्रमित होत आहेत. हे लक्षात घेता, आरोग्य मंत्रालयाने प्रथमच मुलांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

ज्या मुलांना कोरोना इन्फेक्शन आहे परंतु या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, अशा मुलांसाठी कोणतेही उपचार सुचविलेले नाही. त्यांच्या संभाव्य लक्षणांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

सौम्य संसर्गासाठी मार्गदर्शक तत्त्वे

– मुलांना संसर्गाची सौम्य लक्षणे असल्यास जसे की घसा खवखवणे किंवा घसा दुखणे, कफ. पण श्वसनाची कोणतीही समस्या नसल्यास त्यांना इतरांपासून वेगळं ठेवा.
– शरीरात पाण्याची कमतरता टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या, द्रव पदार्थ द्या.
– ताप आला तर 10-15 मिलीग्राम 10-15 mg पॅरासिटामोल (Paracetamol) द्या.
– जर काही गंभीर लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

मध्यम संसर्ग

– या श्रेणीमध्ये अशा मुलांचा समावेश आहे ज्यांच्या ऑक्सिजनची पातळी कमी आहे. परंतु मुलामध्ये न्यूमोनियाची लक्षणे नसतात.
– मध्यम लक्षणे असलेल्या मुलांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल केले जाऊ शकते.
– त्यांना अधिक द्रव पदार्थ द्या. ज्यामुळे डिहायड्रेशन पण ओव्हरहायड्रेशन होऊ नये याची पण काळजी घ्या.
– विषाणूजन्य संसर्ग असल्यास एमोक्सिसिलिन आणि ताप असल्यास पॅरासिटामोल दिले जाऊ शकते.
– जर मुलाच्या शरीरात ऑक्सिजन लेवल 94% पेक्षा कमी असेल तर मुलाला ऑक्सिजन द्यावा लागेल.

गंभीर संसर्ग

– या टप्प्यात मुलांना न्यूमोनिया, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS), मल्टी ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम (MODS) आणि सेप्टिक शॉक सारखे गंभीर लक्षण दिसू शकतात.
– अशा मुलांना त्वरित आयसीयू किंवा एचडीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मार्गदर्शकतत्त्वात या मुलांसाठी कंप्लीट ब्लड काउंट, लिवर, रीनल फंक्शन टेस्ट आणि चेस्ट एक्स रे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तिसऱ्या लाटेचा धोका, राज्य सरकारकडून तयारी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असतानाच आता महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूमुळे त्रस्त असलेल्या महाराष्ट्रासाठी येणारे दिवस आणखी धोकादायक ठरू शकतात. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा अंदाज वर्तविला आहे. तज्ज्ञांचा हवाला देत टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात जुलै किंवा ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, म्हणूनच आम्ही सध्या याला सामोरे जाण्याची तयारी करीत आहोत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटात महाराष्ट्र सर्वाधिक प्रभावित झाला आहे.

ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यावर भर

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात संक्रमणाची अशीच परिस्थिती असेल असे तज्ज्ञ सांगत आहेत. अशा परिस्थितीत जर जुलै किंवा ऑगस्टमध्ये राज्याला कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करावा लागला तर आपली आव्हाने मोठ्या प्रमाणात वाढतील. ते पाहता आम्ही तयारी सुरू केली आहे. विशेषतः आमचे लक्ष ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर आहे.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आढावा बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर टोपे म्हणाले की, या बैठकीत कोविड -19 व्यवस्थापन आणि लसीकरणासह विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. ते म्हणाले की कोरोना रूग्णांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन प्लांट भर दिला. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट पाहता ऑक्सिजनची कमतरता सरकार सहन करणार नाही. म्हणून आतापासूनच पुरेशी व्यवस्था करावी.’

लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याबाबत राजेश टोपे म्हणाले की, 1 मेपासून लसीकरण सुरू करता येणार नाही. त्यांनी सांगितले की राज्यात लसींचा पुरेसा साठा नाही, अशा प्रकारे लसीकरण सुरू करता येणार नाही. राजेश टोपे म्हणाले की, लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी किमान पाच दिवस पुरेसा साठा असावा. ते पुढे म्हणाले की आम्हाला किमान 20 ते 30 लाख डोसची गरज आहे, तरच 18 वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू होऊ शकेल.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button