अर्थ-उद्योग

एक्‍झॉनमोबिल ल्‍युब्रिकण्‍ट्स इंडियाकडून नीरज चोप्रा, मीराबाई चानू, बजरंग पुनिया यांच्‍यासोबत ब्रॅण्‍ड अ‍ॅम्‍बेसेडर सहयोगाचे नूतनीकरण

नवी दिल्‍ली: एक्‍झॉनमोबिल ल्‍युब्रिकण्‍ट्स प्रा. लि.ने आज मोबिल इंडियासाठी टोकियो ऑलिम्पिक्‍समधील पदकविजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू व बजरंग पुनिया यांच्‍यासोबतच्‍या त्‍यांच्‍या ब्रॅण्‍ड अ‍ॅम्‍बेसेडर सहयोगाच्‍या नूतनीकरणाची घोषणा केली. नवी दिल्‍ली येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या भव्‍य सन्‍मान समारोहामध्‍ये कंपनीच्‍या अव्‍वल रिटेलर्सच्‍या उपस्थितीत ही घोषणा करण्‍यात आली.

टोकिेयो २०२० ही एकूण सात पदकांसह भारताची सर्वात यशस्‍वी ऑलिम्पिक मोहिम ठरली. नीरज चोप्रा वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारे पहिले ट्रॅक अ‍ॅण्‍ड फिल्‍ड अ‍ॅथलीट आणि दुसरे भारतीय ठरले. मीराबाई चानू रौप्‍य पदक जिंकणा-या पहिल्‍या भारतीय वेटलिफ्टर ठरल्‍या. इव्‍हेण्‍टमध्‍ये कांस्‍य पदक जिंकलेले बजरंग पुनिया वर्ल्‍ड रेसलिंग चॅम्पियनशीप्समध्‍ये तीन पदके जिंकणारे एकमेव भारतीय रेसलर (कुस्‍तीपट्टू) आहेत. या खेळाडूंमधील एक समान बाब म्‍हणजे ते परिवर्तनाच्‍या प्रबळ कथेचे प्रतीक आहेत. त्‍यांनी अथक मेहनत घेत ऑलिम्पिक्‍समध्‍ये भारताचे प्रतिनिधित्‍व केले.

या विकासाबाबत बोलताना एक्‍झॉनमोबिल ल्‍युब्रिकण्‍ट्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपांकर बॅनर्जी म्‍हणाले, आम्‍हाला नीरज चोप्रा, मीराबाई चानू व बजरंग पुनिया यांच्‍यासोबतचा आमचा ब्रॅण्‍ड सहयोग अपग्रेड करण्‍याचा अत्‍यंत अभिमान वाटत आहे. त्‍यांना जगप्रसिद्धी मिळण्‍यापूर्वीच आम्‍ही त्‍यांच्‍यासोबत सहयोग केला आणि म्‍हणूनच आम्‍हाला त्‍यांना त्‍यांच्‍या संबंधित क्षेत्रांमध्‍ये उत्तम कामगिरी करण्‍यासोबत ऑलिम्पिक्‍समध्‍ये प्रमुख टायटल्‍स व पदके जिंकताना पाहून आनंद होत आहे. अ‍ॅथलीट्सनी भारत आणि ते प्रतिनिधित्‍व करत असलेल्‍या क्रीडाप्रकारामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणला असताना आम्‍ही देखील अथक मेहनत घेत राहू, तसेच मोबिलचे जागतिक दर्जाचे ब्रॅण्‍ड्स, संयोजित नेतृत्‍व व दर्जा निर्माण करत देशामध्‍ये विश्‍वसनीय, उच्‍च दर्जाची कार्यक्षम उत्‍पादने व सोल्‍यूशन्‍स सादर करू.

इव्‍हेण्‍टदरम्‍यान बोलताना एक्‍झॉनमोबिल ल्‍युब्रिकण्‍ट्सच्‍या ग्राहक विपणन विभागाच्‍या विपणन अंमलबजावणीचे महा-व्‍यवस्‍थापक इमतियाज अहमद म्‍हणाले, ‘हे तीन चॅम्पियन्‍स ‘फरक लाकर देखिये’चे प्रतीक आहेत. आम्‍ही भारतामध्‍ये आमचे कौशल्‍य, नवोन्‍मेष्‍कार व कार्यक्षमतेसाठी ओळखले जाण्‍यासोबत लोकांना उज्ज्वल भविष्‍यासाठी त्‍यांच्‍या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्‍याचा आत्‍मविश्‍वास देखील देतो. अ‍ॅथलीट्स आमच्‍या ध्‍येयाशी पूर्णपणे संलग्‍न आहेत आणि आमचा सहयोग सुरू ठेवण्‍यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही.

सन्‍मान समारोहादरम्‍यान एक्‍झॉनमोबिल ल्‍युब्रिकण्‍ट्सने त्‍यांची आधुनिक उतपादने देखील दाखवली जसे मोबिल सुपर एसव्‍ही प्रो आणि मोबिल सुपर मोटो२डब्‍ल्‍यू इंजिन ऑईल अपग्रेडेड श्रेणी, जी नुकतेच जाहिरात मोहिमेच्‍या माध्‍यमातून सादर करण्‍यात आली आणि या मोहिमेमध्‍ये नीरज चोप्रा, मीराबाई चानू व बजरंग पुनिया हे देखील सामील होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button