राजकारण

एकनाथ खडसेंना एक आठवडा अटकेपासून संरक्षण

मुंबई : भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाने एक आठवडा अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. मात्र, या एका आठवड्यात त्यांना विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशानुसार मंदाकिनी खडसे गुरुवारी विशेष पीएमएलए कोर्टात उपस्थित होत्या. ईडीने मनी लाँड्रिंगप्रकराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी खडसे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केलेल्या अर्जावरील सुनावणी न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या एकलपीठापुढे होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button