स्पोर्ट्स

जोस बटलरच्या झंझावाती खेळीच्या जोरावर इंग्लंडची भारतावर ८ गडी राखून मात

अहमदाबाद : इंग्लंडने टीम इंडियावर तिसऱ्या टी 20 सामन्यात 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. जोस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने 18.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. जोस बटलरने 52 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. तर जॉनी बेयरस्टोने 40 धावांची नाबाद खेळी करत बटलरला चांगली साथ दिली. दरम्यान या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान या मालिकेतील चौथा सामना 18 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

मंगळवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली होती. इंग्लंडने १५७ धावांचे लक्ष्य १८.२ षटकांत गाठले. इंग्लंडकडून सलामीवीर जोस बटलरने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने ५२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८३ धावांची खेळी केली. त्याला जॉनी बेअरस्टोने २८ चेंडूत नाबाद ४० धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. त्यामुळे इंग्लंडला हा सामना जिंकण्यात यश आले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनी १-१ विकेट घेतली.

त्याआधी या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. लोकेश राहुल (०), रोहित शर्मा (१५) आणि ईशान किशन (४) हे फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंतने चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. पंतने २० चेंडूत २५ धावा केल्यावर त्याला बटलरने धावचीत केले. कोहलीने मात्र अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवत ४६ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७७ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ६ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली. इंग्लंडच्या मार्क वूडने ३ विकेट घेतल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button