राजकारण

आणीबाणी लागू करणे चुकीचेच होते : राहुल गांधी

कोची : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ ते १९७७ दरम्यान आणीबीणी लागू केली होती. २१ महिने आणीबाणी लावली होती. या आणीबाणी विषयी इंदिरा गांधी यांचे नातू आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत आले आहेत. राहुल गांधी एका कार्यक्रमात म्हणाले की, ‘इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये लावलेली आणीबाणी चुकीची होती आणि त्या काळात जे घडलं तेही चुकीचं होत.’

कॉर्नेल विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात राहुल गांधी उपस्थित राहिले होते. त्यावेळी कौशि बसु यांच्यासोबत व्हर्च्युअल पद्धतीने राहुल गांधींनी चर्चा केली. यावेळी राहुल गांधी केंद्रातील सध्याचे नरेंद्र मोदी सरकार विषयी बोलत होते. त्यावेळेस ते म्हणाले की, त्या काळतील आणीबाणी चुकीची होती, पण त्यावेळी जे काही घडलं आणि आज देशात जे काही होत आहे, यामध्ये खूप फरक आहे. तसेच सध्या भारतात हुकूमशाही सुरू असल्याचा त्यांनी भाजपवर आरोप केला.
याआधी राहुल गांधी २०१९च्या लोकसभा निवडणुकी दरम्यानच्या एका मुलाखतीत इंदिरा गांधी यांनी लावली आणीबाणी चुकीची असल्याचे म्हणतं माफी मागितली होती. तसेच इंदिरा गांधी यांनी देखील २४ जानेवारी १९७८ रोजी महाराष्ट्रातील एका रॅलीत जाहीरपणे माफी मागितली होती.

आता भाजपने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे – नवाब मलिक
४५ वर्षांनंतर राहुल गांधी यांनी कुठेतरी आणीबाणी ही चूक असल्याचे मान्य केले आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. विधानभवनाच्या मिडिया हाऊस येथे मंत्री नवाब मलिक यांनी ही मागणी केली आहे. जर काँग्रेस चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप केव्हा चूक सुधारणार याची माहिती जनतेला द्यावी. दिल्ली दंगलीबाबत काँग्रेसने माफी मागितली होती, आता गुजरात दंगलीबाबत भाजपने माफी मागावी असेही नवाब मलिक म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button