अर्थ-उद्योगसाहित्य-कला

सोशल-कॉमर्स मंचाच्या माध्यमातून मराठीचा प्रसार

मुंबई : भारत ही समृद्ध आणि व्यापक सांस्कृतिक वैविध्यतेची भूमी आहे. इथे प्रत्येक ५०० किलोमीटरमध्ये भाषा, संस्कृती आणि वांशिकता यांच्यातील फरक दिसून येतो. जगभरात ७,००० भाषा बोलल्या जातात. त्यातील फक्त भारतात जवळपास २,००० भाषांमध्ये संवाद साधला जातो. त्याखेरीज २२ मान्यताप्राप्त भाषांमधील मराठी ही सर्वाधिक सामान्यतः वापरली जाणारी भाषा असून ८३ दशलक्षपेक्षा अधिक लोक या भाषेत संवाद साधतात. ख्यातनाम मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रजांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

मराठी दिनाच्या निमित्ताने आम्ही सांगत आहोत तरूण आणि बुद्धिमान मराठी साहित्य निर्माती असलेल्या श्रुतीची गोष्ट. तिला आपल्या साहित्याद्वारे भाषेचा वारसा पुढे नेताना अभिमान वाटतो आहे. आज २० टक्क्यांपेक्षा कमी भारतीय लोकसंख्या बिगर इंग्रजी आहे आणि स्थानिक भाषांमधील साहित्य वाचणे ते पसंत करतात. व्हिडिओ कंटेंटच्या क्षेत्रात प्रादेशिक भाषांना प्राधान्य आणि मागणी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. मराठी भाषा भारतात व्यापक प्रमाणावर बोलली जात असली तरी स्थानिक समुदायांमध्ये सहजपणे वापरली जाईल अशा सुसंगत जीवनशैली माहिती मनोरंजन साहित्याचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुंबईस्थित प्रमाणित मेकअप आणि हेअर स्टायलिस्ट असलेली श्रुती चव्हाण हिला ही गरज जाणवली आणि तिने ट्रेलवर मराठी भाषा साहित्य निर्मिती करण्याचा पर्याय निवडला.

तिला अशा प्रकारे साहित्य निर्मिती करायची होती, जेणेकरून प्रेक्षकांना नवीन गोष्टी शिकता येतील आणि सहजपणे त्याच्याशी जोडून घेता येईल कारण ते त्यांच्या स्वतःच्या भाषेतील साहित्य आहे. तिने साहित्य निर्मितीचे आणि ट्रेलमधील आपल्या प्रेक्षकांना कशा प्रकारे सहभागी करून घ्यायचे ते कौशल्य शिकून घेतले. श्रुतीने आता ट्रेलवर ८.५ लाख लोकांना सहभागी करून घेतले आहे. मराठीमध्ये कस्टमाइज्ड आणि सर्वसमावेशक व्हिडिओ कंटेन्ट निर्मिती केल्यामुळे श्रुतीला विश्वास, सांस्कृतिक सुसंगत आणि जास्त वापर सहभाग साध्य करणे शक्य झाले आहे. श्रुती मागील एका वर्षापासून ट्रेलवर कंटेन्ट निर्मिती करत आहे आणि तिने मागील सहा महिन्यांत जवळपास १,६५,००० रूपये मिळवले आहेत.

मराठीत साहित्य निर्मिती करण्याच्या महत्त्वाबाबत बोलताना श्रुती म्हणाली की, भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देश आहे आणि अशा व्यापक क्षेत्रात भाषा खूप महत्त्वाची भूमिका बजावते कारण ती दर १५-२० किलोमीटरवर बदलते. सर्व लोकांना इंग्लिशमध्ये साहित्य समजते किंवा ते त्याच्याशी जोडून घेऊ शकतात असे नाही. त्यामुळे आजच्या विचार प्रवर्तन आणि जनतेशी जोडले जाण्याच्या युगात आणि विशेषतः टायर २ आणि ३ शहरांमधील वाढते ग्राहक आणि प्रेक्षक यांच्यामुळे संबंधित साहित्य प्रादेशिक भाषांमध्ये तयार करण्याची गरज वाढली आहे. मराठी ही भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे आणि भारतातील प्रादेशिक बोलीभाषेचे चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोक येथे आहेत. मी तयार करत असलेलाकंटेन्ट प्रेक्षकांना कळेल याची मी काळजी घेते. त्यामुळे मला ट्रेलच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवणे आणि मदत करणे शक्य होईल.”

अलीकडील वर्षांमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या कंटेन्ट निर्मात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ते व्हिडिओ साहित्याच्या क्षेत्रात मोठी कामगिरी करत आहेत. ट्रेलसारखे इन्फ्लुएन्सरवर आधारित सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म प्रादेशिक साहित्य निर्मात्यांसाठी त्यांच्या साहित्याचे रोखीकरण आणि स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी संधी निर्माण करत आहे. ट्रेल ब्रँड्सना इन्फ्लुएन्सरवर आधारित ब्रँड जागरूकतेद्वारे भारतातील प्रादेशिक बाजारपेठांमध्ये खोलवर प्रवेश करण्यासाठी मदत करत असताना ते कंटेन्टनिर्मात्यांनाही त्यांच्या आवडीतून उत्पन्न मिळवण्यासाठी आणि पूर्णवेळ कंटेंटप्रेनर्स बनण्यासाठी सक्षम करत आहेत.

सध्या ट्रेलकडे प्लॅटफॉर्मवर १८ दशलक्षपेक्षा अधिक कंटेन्ट निर्माते आहेत. ते ६० दशलक्षपेक्षा अधिक मासिक कार्यरत वापरकर्त्यांच्या समविचारी समुदायासोबत आपल्या आवडी शेअर करतात. त्यातील १० दशलक्षपेक्षा अधिक कंटेन्ट निर्माते दर महिन्याला ३४ दशलक्षपेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड करतात. प्लॅटफॉर्मवर २० अब्जापेक्षा अधिक मासिक कंटेन्ट व्ह्यू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button