राजकारण

मनसे – शिवसैनिकांमध्ये तुफान राडा, मनसेचे प्रवीण मर्गज यांच्या डोळ्याला दुखापत

मुंबई : विविध कारणांमुळे मनसे-शिवसेनेत नेहमी वाद सुरु असतो. मात्र, यांच्यातील वाद आता थेट हाणामारीवर उतरला आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारे दोन्ही पक्ष आज एकमेकांविरोधात हाणामारी करत असल्याचं बघियला मिळत आहे. जोगेश्वरी पूर्वेत संबंधित प्रकार घडला आहे

जोगेश्वरी पूर्वेला प्रभाग ७३ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण शिंदे यांच्या घराजवळ मजास नाल्याचे साफसफाईचे काम सुरू होते. त्या दरम्यान मनसेचे उपाध्यक्ष प्रवीण मर्गज यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्याठिकाणी असलेल्या कंत्राटदाराला मनसेने विचारपूस केली. त्यादरम्यान त्याठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक शिंदे हे सुद्धा त्यांच्या साथीदारांसोबत पोहोचले. त्यावेळी दोन्ही पक्षामध्ये बाचाबाची सुरू झाली, त्याचे रूपांतर मारामारीमध्ये झाले.

या हाणामारीत मनसेचे मर्गज यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती मेघवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिपळे यांनी दिली आहे. या घटनेनंतर मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. पोलीस मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सध्या आपल्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button