कृषी वीज बिल कोरे करणारे उपायुक्त वामन कदम यांचा सत्कार

औरंगाबाद/मुंबई : कृषीपंप वीज ग्राहक शेतकरी तथा औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त वामन गणपत कदम यांनी त्यांच्याकडे थकीत असलेल्या वीज बिलाची 1,17,050 रूपये एकरकमी भरून कृषी धोरण 2020 योजनेचा लाभ घेवून त्यांचे वीज बिल कोरे करून घेतले. त्यामुळे महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ नरेश गिते यांच्या हस्ते वामन कदम यांना सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
उपायुक्त वामन कदम यांना कृषी धोरण 2020 योजनेची सविस्तर माहिती सहव्यवस्थापकीय संचालक डॉ नरेश गिते यांनी सांगीतली. तसेच या योजनेत जास्तीत जास्त शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. योजनेचे महत्व पटल्याने वामन कदम यांनी एक रक्कमी वीज बिल भरणा केल्याने त्यांचे आभार मानले.
कमळापूर, ता. लोहारा येथील कृषीपंप वीज जोडणीच्या बिलाची 1,26,264.41 मूळ थकबाकी होती. यापैकी त्यांनी 60,030 रूपये एकरक्कमी भरणा केला. यात त्यांना 67,000.1 रूपये वीज बिलात सुट मिळाली. तर कमलापुर, ता. उमरगा येथील कृषीपंप वीज जोडणीच्या बिलाची 1,13,743.62 मूळ थकबाकी होती. यापैकी त्यांनी 57,020 रूपये एकरक्कमी भरणा केला. यात त्यांना 76,509.68 रूपये वीज बिलात सुट मिळाली. असे एकूण त्यांनी 1,17,050 रूपये एकरक्कमी वीज बिल भरणा करून वीज बिल कोरे केल्याने 1,43,509.69 रूपये सुट मिळाली.